मुख्य सामग्रीवर वगळा

स्वाध्याय, विज्ञान 2. इयत्ता 10 वी. 1 अनुवंशिकता व उत्क्रांती.


स्वाध्याय, विज्ञान 2. इयत्ता 10 वी. 1 अनुवंशिकता व उत्क्रांती.


꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂



इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वी विज्ञान विषयक माहितीसाठी खालील लिंकला स्पर्श करा.

माहिती विज्ञानाची🎷

 *▙░▓▓▓❖◣🎷◢❖▓▓▓░▟*

निव्वळ लिखाण📝 म्हणजे अभ्यास नव्हे. 


अभ्यास करणाऱ्या📚 मुलांपेक्षा अभ्यास न करणारी मुलं ही दरी प्रचंड वाढत आहे.


 बऱ्याच पालकांना असे वाटते की आपली मुलं लिहीत ✍️ आहेत म्हणजे अभ्यास करत आहेत. ती मुलं केवळ इकडून पाहून तिकडे लिहीत🖊️ असतात.


नम्र विनंती:- हा उपक्रम म्हणजे पूर्ण अभ्यास नव्हे. विद्यार्थ्याने खरोखर धडा व्यवस्थित वाचला आहे की नाही, त्याला धड्याचे आकलन झाले आहे का नाही यासाठी चा हा प्रयत्न आहे.


शिक्षकाच्या हातात प्रयत्न करणे हे सगळ्यात मोठे शस्त्र आहे. मुलांना स्वाध्याय दिल्यावर मुलं नवनीत, कोहिनूर, इन माय पॉकेट..... यामधून पाहून लिहितात. असे कॉपी-पेस्ट करण्यापेक्षा त्यांच्यात बदल करण्यासाठी धड्यातून स्वाध्याय दिल्यास तो धडा वाचणे मुलांना क्रमप्राप्त ठरेल. धडा वाचून प्रश्नांची उत्तरे शोधून लिहिल्यास त्यांचा लिखाण सरावासोबत अभ्यास वाढेल. 


पाठ्यपुस्तकातून प्रश्न देताना ही काळजी घेतली की धड्याप्रमाणे सलग प्रश्न न विचारता कोणत्याही पानावरचे प्रश्न हे क्रमशः राहणार नाहीत.

या धड्याचा स्वाध्याय विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठीही एक आव्हान ठरणार आहे.


  ⏤͟͟͞͞*⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞


  1.  आपल्याला अक्कलदाढेचा अन्न चावून खाण्यासाठी खरंच उपयोग होतो का?
  2.  ……. हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे,
  3.  स्थानांतरण- व्याख्या लिहा.
  4.  जेव्हा  प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे ….. ग्रहण करणे थांबत
  5.  सजीवाच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात यालाच …… गुणांचा अनुवंश असे म्हणतात.
  6. प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा …. चाच परिणाम आहे.
  7.  सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या …… विकास झाला.
  8. उत्क्रांतीमागे त्या त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार ……  नी मांडला.
  9.  कार्बनी वयमापन पद्धत ही नैसर्गिक कार्बन 14 (C14) च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली असून ……… यांनी 1954 मध्ये विकसित केली.
  10. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना …….  म्हणतात.
  11. प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होत आहेत?
  12. डी.एन.ए.चा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो?
  13. व्याख्या लिहा- ‘ट्रिप्लेट कोडॉन’
  14. कोणतेही चार उत्क्रांतीचे पुरावे लिहा.
  15. व्याख्या लिहा- उत्क्रांती
  16. …… हा जरी मत्स्य असला तरी फुप्फुसाद्वारे श्वसन करतो.
  17. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास ……. असे म्हणतात.
  18.  ‘……. मानव’ हे ‘बुद्धिमान मानव’ या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल.
  19.  चार्ल्स रॉबर्ट डार्विन (1809-1882) या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने ....... सिद्धांत मांडला.
  20. व्याख्या लिहा- उत्परिवर्तन.
  21.  सजीवांच्या पेशीकेंद्रातील आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता?
  22. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ (जीवद्रव्य) पृथ्वीवर …… निर्माण झाला.
  23. मानवाला निरुपयोगी असणारे …….  हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे.
  24.  ………. हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो; परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यांमुळे सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
  25. 26. सुमारे10,000 वर्षांपूर्वी ‘बुद्धिमान मानव’ ….. करू लागला.

27. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे ……  .

28. हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे, पहिले मानवसदृश प्राणी सुमारे …… कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले.

29. स्पष्ट करा- सेंट्रल डोग्मा.

30. सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने ……. होतो.

31. डार्विन याने नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतासाठी  .................   हे पुस्तकही प्रसिद्ध केले.

32. 1902 साली ………….. याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली.

33. सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत?

34. मानवसदृष्य प्राण्याची आपल्याकडे सर्वांत पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील आिण उत्‍तर भारतातील ….. या एपची.

35. सुमारे 5000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि …… ची सुरुवात झाली

36. आनुवंशिक विकृती म्हणजे काय हे सांगून काही आनुवंशिक विकृतींची नावे सांगा.

37. विकासाचा कालपट जवळजवळ ….. कोटी वर्षांचा आहे.

38. स्पष्ट करा- भाषांतरण

39. शरीरातील प्रत्येक अवयव सजिवास उपयोगी पडतो का?

40. ………. मुळे सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृतीही निर्माण होतात.

41. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच ……. म्हणतात.

42. टीप लिहा- प्रतिलेखन

43. आपल्या पचनसंस्थेतील आंत्रपुच्छ या अवयवाचे काम काय आहे?

44. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताबद्दल 3 आक्षेप कोणते?

45. टिप लिहा -कार्बनी वयमापन.

46. लॅमार्कवाद म्हणजे काय?

47. सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी अखेरचे …… नाहीसे झाले.

48. सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ……चा विकास झाला.

49. सुमारे …… हजार वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदूपुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव (होमो-सॅपियन) या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता

50. काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये ……..  हीच आनुवंशिक सामग्री असते.

52. डायनासोरसारखे महाकाय प्राणी नामशेष का झाले?

54. भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे ……  होय.

55. आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात?

56. भारतीय वंशाच्या डॉ. हरगोविंद खुराना यांनी सर्व …… अमिनो आम्लांकरिता असलेलेकोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

       


*▓▓▓▓▓▓🛞▓▓▓▓▓*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...