8 वी विज्ञान, 5.3 - अणूचे अंतरंग- नोट्स.
*❀꧁✦꧂❀*🎷
*┅━━━━━•❀•━━━━━┅*
╔═══ ▓▓ ࿇࿇ ▓▓ ═══╗
इलेक्ट्रॉन वितरण:
- बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात.
- कवचांना विशिष्ट ऊर्जा असते.
- अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच, त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच म्हणतात.
- कवचांच्या क्रमांकासाठी ‘n’ ही संज्ञा वापरतात. n = 1,2, 3, 4, ... या क्रमांकानुसार कवचांना K, L, M, N,.... ह्या संज्ञांनी संबोधण्यात येते.
- प्रत्येक कवचात जास्तीत जास्त ‘2n2 ’ या सूत्राने मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन असू शकतात.
- ‘n’ चे मूल्य वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते.
~*< •°•🥀 •°• >*~
कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या
सूत्र 2n2
संज्ञा n इलेक्ट्रॉन संख्या
K 1 2
L 2 8
M 3 18
N 4 32
P 5 50
Q 6 72
R 7 98
✤⊰❉⊱═⊰࿇⊱═⊰❉⊱✤*
🦅 अणूची संरचना व सूर्यमाला यांच्यात साधर्म्य आहे. सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती गुरूत्वीय
बलामुळे फिरतात. अणुसंरचनेत कोणते बल कार्यरत असेल ?
उत्तर:- स्थिर-विद्युत बल आणि केंद्रकीय बल अणुसंरचनेत कार्यरत असे✊
━━•❀•━━
🪽 केंद्रकात अनेक धनप्रभारित प्रोटॉन एकत्र असतात. केंद्रकातील न्यूट्रॉन्सचे एक कार्य काय
असेल असे तुम्हांला वाटते ?
उत्तर:- न्यूट्रॉन्सचे कार्य✊
- अणु केंद्रकाला स्थिरता देणे
- अणु केंद्रकाला बांधून ठेवणे
- अणूचे वस्तुमान निश्चित करणे
_____ [🤞🏻] _____
इलेक्ट्रॉन संरूपण:
एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे
इलेक्ट्रॉन संरूपण होय. उदा. सोडिअमचे (Na) इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,1 आहे. याचा अर्थ सोडिअम अणूमध्ये ‘K’ कवचात 2, ‘L’ कवचात 8 व ‘M’ कवचात 1 याप्रमाणे एकूण 11 इलेक्ट्रॉन वितरित केलेले असतात.
*⋐⋑🔸⚜️ 🔸⋐⋑*
प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते.
𝄄𝄅𝄈⧗⃝✿*~> ~*✿⃝𝆭⧗⃪ ꯭𝄈𝄅𝄄𝄅🪈꯭
पहिल्या कवचातील (K कवच) इलेक्ट्रॉनांची ऊर्जा सर्वांत कमी असते.
*།།◆️___✤___◆️།།*
K कवचा पुढील कवचामधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा कवचक्रमांकाप्रमाणे वाढत जाते.
*✦---⚜️----✦*
मूलद्रव्याच्या अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण असे असते की त्यायोगे सर्व इलेक्ट्रॉनांची
एकत्रित ऊर्जा कमीत कमी असते.
अणूतील इलेक्ट्रॉन कवचांच्या कमाल धारकतेप्रमाणे तसेच ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार असलेल्या कवचांमध्ये स्थान मिळवतात.
🪔═⊰࿇⊱═🪔
इलेक्ट्रॉन संरूपण
..•♡•:.:✦:.:•♡•..
✍️ संयुजा:
- एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्यांची संयुजा होय.किंवा
- द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असे म्हणतात. किंवा
- संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची दुसऱ्या अणूशी संयोग पावण्याची क्षमता.
- जेव्हा एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्यांशी संयोग पावते तेव्हा त्याच्या या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा म्हणतात.
_____ [•°•🤞🏻•°•] _____
✍️ काही इलेक्ट्रॉन संरुपणाचे रेखाटन
____ •°•⛓️ •°• _____
🪷 पुढील H, Cl, O, S, N, C, Br, I, Na यांच्या संयुजा ठरवा.
H- 1
Cl- 1
O- 2
S- 2
N- 3
C- 4
Br- 1
I-1
Na- 1
࿇▓▓ ✌️ ▓▓࿇
1. विविध अणूंमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावलेले असतात त्या कवचांच्या संज्ञा कोणत्या आहेत ?
K - 2
L - 8
M - 18
N - 32 .......
2. सर्वात आतील कवचाची संज्ञा व क्रमांक काय आहे ?
सर्वात आतील कवचाची संज्ञा K व
क्रमांक - 1.
3. फ्लुओरीन अणूमधील इलेक्ट्रॉन ज्या कवचांमध्ये
वितरित झालेले असतात त्यांच्या संज्ञा लिहा.
फ्लुओरीन अणूमधील इलेक्ट्रॉन ज्या कवचांमध्ये
वितरित झालेले असतात त्यांच्या संज्ञा
K व L
K - 2
L - 7
F - 2, 7.
4. फ्लुओरीन अणूमधील सर्वांत बाहेरचे म्हणजे बाह्यतम
कवच कोणते ?
फ्लुओरीन अणूमधील सर्वांत बाहेरचे कवच - L.
5. सोडिअम अणूमधील बाह्यतम कवच कोणते?
सोडिअम अणूमधील बाह्यतम कवच - M.
6.हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच कोणते?
हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच -K.
______࿇~*~࿇______
🪷 संयुजा व इलेक्ट्रॉन संरूपण यातील संबंध
~*<~*~*~*~>*~
- अणूंची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते.
- अणूंच्या बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात.
- संयुजा इलेक्ट्रॉन: बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन.
╚════ ▓▓ ࿇࿇ ▓▓ ════╝
_*आयुष्यात अनावश्यक किंवा
मनाला दुखावणाऱ्या गोष्टींकडे
दुर्लक्ष करण्याचे कौशल्य
जसजसे वाढत जाते...,*_
*तसतसा माणूस "सुखी " होत जातो...*_
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
࿇▓▓ ✌️ ▓▓࿇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा