मुख्य सामग्रीवर वगळा

8 वी विज्ञान, 5.1- अणूचे अंतरंग नोट्स.


 8 वी विज्ञान, 5.1- अणूचे अंतरंग- नोट्स.


 𝄅𝄄𝄅𝄈✿~> ~✿⃝𝆭⧗⃪ ꯭𝄈𝄅𝄄𝄅🪈꯭


What's App Group Join Now

 
╭✺༺☬༒☬༻✺╮

  • द्रव्य म्हणजे काय?
 द्रव्य म्हणजे भौतिक जगाचा आधारस्तंभ, जे जागा व्याप्ते व ज्यास वस्तुमान असते त्यास द्रव्य म्हणतात.

       ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
  • णु म्हणजे काय?
  1. अणु म्हणजे पदार्थाचे अतिसूक्ष्म कण, जे पदार्थाचे घटक आहेत.                  किंवा
  2. पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणु असे म्हणतात.   
                ⋐⋑🔸 ⚜️ 🔸⋐⋑
  • द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता?
  1. द्रव्याचा सर्वात लहान घटक अणू आहे.
  2. अणू हे रासायनिक मूलद्रव्यांचे सर्वात लहान घटक आहेत आणि ते अविभाज्य मानले जातात. 
  3. द्रव्य हे रेणूंचे बनलेले असते.
  4. * रेणू हे अणुंपासून बनलेले असतात.
  5. * अणू हे द्रव्य सर्वात लहान आहे.
  6. * सर्व भौतिक व रासायनिक बदलात आपली स्वतःची ओळख राखणारा लहान कण म्हणजे अणू होय.
  7. * रेणू हे दोन किंवा अधिक अणूंच्या संयोगाने बनलेले असतात, जे रासायनिक बंधाने जोडलेले असतात. हायड्रोजन- H2 , पाणी- H2O, ग्लुकोज-C6H12O6
  8. * काही रेणूंमध्ये एकच अणू असतो. उदा. हेलियम (He), निऑन (Ne), आर्गॉन (Ar), क्रिप्टॉन (Kr), झेनॉन (Xe), आणि रेडॉन (Rn).

            ❀꧁ ꧂❀

  • *   भारतीय तत्वज्ञ कणाद-

  1. ख्रिस्त पूर्व ६ वे शतक.
  2. * द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, असे भारतीय तत्वज्ञ कणाद यांनी सांगितले.
  3. द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना कणाद मुनींनी परमाणू (म्हणजे लहान कण) असे नाव दिले. 
  4. कणाद यांनी असेही मत मांडले की परमाणू अनाशवंत असतो.

━━━━✧❂✧━━━━

  • ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस-

  1. * ख्रिस्त पूर्व ५ वे शतक.
  2. * डेमोक्रिटस यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य लहान कणांचे बनलेले असते व ह्या कणांना कापता येत नाही.
  3. * द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ॲटम असे नाव दिले.
  4. * ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा.

████╗

████║

████╝


  • डाल्टनचा अणुसिद्धांत-
            डाल्टन चे अणुप्रारुप

  1. *   इ.स. 1803 मध्ये ब्रिटीश शास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध सिद्धांत मांडला. अणू हे अविभाजनीय आणि अनाशवंत असतात.
  2. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात तर  भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात आणि त्यांचे वस्तुमान भिन्न असते.
  1. डाल्टनच्या अणु सिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असते.

▬▬▬۩۞۩▬▬▬

  • थॉमसनचे प्लम पुडिंग अणुप्ररूप:-

  1. * जे. जे. थॉमसन यांनी ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉनचा शोध लावला.
  2. ॠणप्रभारीत इलेक्ट्रॉन कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते.
  3. * थॉमसनच्या अणु प्रारूपानुसार अणुमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ॠण प्रभारीत इलेक्ट्रॉन जडवलेले असतात.
  4. * अणुमध्ये पसरलेल्या धनुप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होते. त्यामुळे अणु विद्युत उदासीन होतो.
..•♡•.:•♡•..

रुदरफोर्ड चा विकिरण प्रयोग:-

रुदरफोर्ड यांनी सोन्याचा अति लहान पत्रा जाडीः 10-4 मिमी घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित α-  कणांचा मारा केला. 
सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रतिदीप्तीमान पडदा लावून त्यांनी α- कणांच्या मार्गांचा वेध घेतला.
जर अणूंमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असेल तर धन प्रभारित α कणांचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. अनपेक्षितपणे बहुसंख्य α-कण पत्र्यातून आरपार सरळ गेले, काही थोड्या a -कणांचे मूळ मार्गापासून लहान कोनामधून विचलन झाले, आणखी थोड्या α कणांचे मोठ्या कोनातून विचलन झाले आणि आश्चर्य म्हणजे 20000 पैकी एक α- कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. -
 
✿¸.•*¨*•..¸✿✧✿¸.•*¨*•..¸✿

रुदरफोर्ड च्या विकिरण प्रयोगाचा निष्कर्ष कोणता :-
1. मोठ्या संख्येने आरपार गेलेले α- कण असे -दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता.
 याचा अर्थ सोन्याच्या स्थायुरूप पत्र्यामधील अणूंच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. 
2. ज्या थोड्या α- कणांचे लहान किंवा मोठ्या कोनातून विचलन झाले त्यांच्या वाटेत अडथळा आला. याचा अर्थ अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता.

━━━━✧❂✧━━━━

  • रुदरफोर्डचे केंद्रकीय अणूप्रारूप (1911)

रूदरफोर्डचे केंद्रकीय प्रारूप 

1. अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. 

2. केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. 

3. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. 

4. सर्व इलेक्ट्रॉनांवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभाराएवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. 

5. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक ह्यांच्या दरम्यान पोकळी असते.


✦-------✦

रुदरफोर्डच्या अणुप्रारुपातील त्रुटी निल्स बोर यांनी दूर केली.

།།◆️____◆️།།

बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारुप

सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी 

स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणुचा स्थायीभाव स्पष्ट केला. 

बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधारतत्वेपुढीलप्रमाणे आहे.

 1. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन

केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री

वर्तुळाकार कक्षामध्ये असतात.

2. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते.

(iii) इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी 

मारताना फरकाइतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर 

बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरकाइतकी ऊर्जा उत्सर्जित करतो.

╰✺༺☬༒☬༻✺╯


▬▬▬۩۞۩▬▬▬

❄️: ⁣⋱ ⋮ 🧿:✨:⋰:❄️


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...