मुख्य सामग्रीवर वगळा

स्वाध्याय,1.गुरुत्वाकर्षण,10 वी., भाग 1.

 

स्वाध्याय,1.गुरुत्वाकर्षण,10 वी., भाग 1.

▬▬▬۩۞۩▬▬▬🎷
  • ज्या विद्यार्थ्यांचा धड्याचा अभ्यास व्यवस्थित त्यांना ह्या स्वाध्याय सोडवणे सोपे जाईल.
  • गाईड, कोहिनूर, इन माय पॉकेट यांचा हा स्वाध्याय सोडवताना काहीही उपयोग होणार नाही.
  • धड्यातील अनियमित पानांचा वापर करून हा स्वाध्याय तयार केला आहे.
  • हा स्वाध्याय सोडवताना विद्यार्थ्यांचा कस पणाला लागणार आहे.
  • धड्यातील छोट्या छोट्या घटकांचा विचार करून स्वाध्याय तयार केला तर धड्याची संपूर्ण तयारी छान होते. यालाच आपण सूक्ष्मा कडून अनंताकडे असे म्हणू. 🎷
  • स्वाध्याय रिकाम्या जागा या स्वरूपातच का? घेत आहोत तर त्या वाक्यासाठी योग्य शब्द म्हणजे रिकामी जागा. 💫
  • पर्याय का देत नाही, पर्याय दिल्यास त्या चार पर्यायांपैकी एक उत्तर असणार आहे. म्हणजेच आपल्याला फक्त त्या चार शब्दांचाच विचार करायचा असतो.🏮

What's App Group Join Now

 ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ━┅┉



  • न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहा.
  • अवकाश स्थानकावर g चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ ..... % ने कमी असते.
  • ....... हे परावर्तक दुर्बिण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते.
  • अभिकेंद्री बल म्हणजे काय?
  • SI एकक प्रणालीत G चे एकक .......  आहे.
  • ..... म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग.
  • ......... म्हणजे एखाद्या शंकूला एक प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती.
  • ग्रहाची कक्षा ही ........ असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.
  • ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ही समान कालावधीत समान ......... व्यापन करते.
  • .......... मुक्तिवेगाएवढा असलेली, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते.
  • सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा ..... हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.
  • g चे SI एकक ...... आहे.
  • अभिकेंद्री बलाची दोन उदाहरणे द्या.
  • न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ........चे नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले.
  • ...... यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले.
  • दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे त्यांमधील गुरुत्वीय बल ...... होते. 
  • सर्वात क्षीण बल कोणते?
  • वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते, तिला ........ ऊर्जा म्हणतात.
  • ...... चे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅवेण्डिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले.
  • SI एकक प्रणालीत G चे मूल्य ........ आहे.
  • सूर्य व ग्रह यमधील  .........  बल, जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते.
  • पृथ्वीच्या केंद्रावर g चे मूल किती असेल?
  • चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती का फिरतात?
  • 1 kg वस्तुमानाचे वजन 1 x 9.8 = ...... असते.
  • g चे मूल्य .......वर सर्वात जास्त म्हणजे 9.832 m/ s2 आहे.
  • पृथ्वीची त्रिज्या 6400 km  आहे.
  •  ....... चे गुरूत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरूत्वीय बलाच्या एक षष्ठमांश असते.
  • चूक की बरोबर:- मुक्त पतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नसतो.

➖♾️⭕🔘⭕♾️➖

📝खाली चार अधिक चार मुद्दे हे क्रमशः दिले आहेत, कारण ते वस्तुमान व वजन फरकाचे क्रमशः मुद्दे आहेत. फरक नेहमी डावी बाजू व उजवी बाजू असाच लिहावा. खाली दिल्याप्रमाणे जर फरक लिहिला तर गुण दिले जात नाहीत.
  • व्याख्या:- कोणत्याही वस्तूचे .......... म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन होय.
  • वस्तुमान ही .......  राशी आहे. 
  • ........ चे मूल्य सगळीकडे सारखेच असते. 
  • वस्तुमानाचे SI एकक ........ आहे.
  • व्याख्या:- एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला ....... असे म्हणतात.
  • वजन हे बल असल्याने ती एक ........ राशी आहे. 
  • वस्तूचे ...... स्थानाप्रमाणे बदलते. 
  • वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक ...... आहे. 

 ┈┉━ *❍❀❀❍* ━┉┈

  • विद्युत चुंबकीय तरंगाचे विभिन्न प्रकार कोणते?
  • ........  ....... केवळ निर्वातातच शक्य आहे.
  • पृथ्वीवरील एका स्थानावर ........ चे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एकसमान असते.
  • चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहांवर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयानांचा आरंभीचा वेग ...... वेगापेक्षा अधिक असणे आवश्यक असते.
  • विषुववृत्तावर g चे मूल्य सर्वात कमी म्हणजे ....... m/s2 आहे.
  • LIGO चे दीर्घ रूप लिह.

┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ━┅┉┈

*_या जीवनात दुःख कधीच संपत नसतात,_*
*_रूप बदलून पुन्हा पुन्हा भेटायला येतात._*
*_म्हणून मिळेल त्या क्षणाचा आनंद घ्या._*
*_कारण हे जीवन अनमोल आहे._*
*_🌺🌻 🎷🌻🌺_*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...