मुख्य सामग्रीवर वगळा

11 वी प्रवेश संभ्रम / शंका / लॉक🔒 / पसंती क्रम

11 वी प्रवेश संभ्रम / शंका / लॉक🔒 / पसंती क्रम 

●~•❅•۞•❅•~●

पहिली फेरी: -

इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी 26/05/2025 ते 05/06/2025 हा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.

┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━


🎷विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न


1. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग 1 लॉक केला आहे

 तथापि 

  • भाग 2 अद्याप भरणे बाकी आहे

किंवा 

  • लॉक करणे बाकी आहे


अशा विद्यार्थ्यांसाठी 

दिनांक 6 जून 2025 रोजी दुपारी 12:25 ते 7 जून 2025 दुपारी 12:30 या कालावधीत आपल्या अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपला पसंतीक्रम अर्ज भाग 2 दिलेल्या वेळेत लॉक करावा.


 🔥 लॉक न केल्यास

 विद्यार्थ्यांनी भाग 2 भरून लॉक न केल्यास त्यांना 

  • प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साठी 
व 
पहिल्या फेरीत प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय देण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

🎆 पसंती क्रम बदलण्याची सुविधा:  

 यापूर्वी भाग 2 लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंती क्रम बदलण्याची सुविधा यादरम्यान मिळणार नाही.

┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━


2. 

  • ज्या विद्यार्थ्यांनी दि. 05 जून 2025 पर्यंत ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा 
  • आपला प्रवेश अर्ज भाग 1 भरलेला नाही 
अथवा 
  • प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग 1 पूर्ण करू शकले नाहीत, 
  • अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग 1 व भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.


* त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. 

विद्यार्थ्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत. 

प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. 

यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी.

┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━


प्रवेश प्रक्रियेचे पोर्टल

 : https://mahafyjcadmissions.in


इयत्ता. 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे यांच्या तर्फे सुरू करण्यात आलेले अधिकृत व्हॉट्स अप चॅनेल👇


https://whatsapp.com/channel/0029VbB2T6DBA1etTOdyi10C

┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━


या चॅनेल वर विद्यार्थ्यांना सर्व अपडेट दिले जातील. 

●~•❅•۞•❅•~●


                  _*जिवंत आहे तो पर्यंत नात्यांना वेळ द्या,*_ 

                  _*ताजमहाल जगाने पाहिला आहे, मुमताजने नाही.*_


   *आपला दिवस आनंदी जावो.*🎷


          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...