मुख्य सामग्रीवर वगळा

इयत्ता:- 8 वी, आरोग्य व रोग 1

 

इयत्ता:- 8 वी, आरोग्य व रोग


आपल्या विज्ञान विषयक What's App समूहात सामील होण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा 🙏

WhatsApp Group Join Now

या पाठात आपण विविध आजार, कारणे, प्रसार, लक्षणे व उपाय या बाबींचा अभ्यास करणार आहोत.

💪 आरोग्‍य (Health)

रोगाचा नुसता अभाव म्‍हणजेच आरोग्‍य नव्‍हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरीत्‍या पूर्णतः सुदृढ असण्याची स्‍थिती म्‍हणजे आरोग्‍य.

🪰 रोग म्‍हणजे काय ?

शरीरक्रियात्‍मक किंवा मानसशास्‍त्रीयरीत्‍या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्‍थिती म्हणजे रोग होय.

🦠 रोगांचे प्रकार (Types of Diseases)

🌅 कालावधीनुसार

 

1. दीर्घकालीन रोग

2.  तीव्र रोग

कारणांनुसार

अनुवंशिक रोग

उदा. डाऊन संलक्षण

उपार्जीत रोग

संसर्गजन्य रोग

उदा. सर्दी, फ्लू, डेंग्यू

असंसर्गजन्य रोग

उदा. मधुमेह, हृदयविकार

संसर्गजन्य रोग/संक्रामक रोग : दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक (कीटक व प्राणी) याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय. 

   

@ रोगाचे नाव:- क्षय

(Tuberculosis)

कारक:- जीवाणू

(मायकोबॅक्‍टेरिअम ट्युबरक्‍युली)

संक्रमणाचे माध्यम:- रोग्‍याच्‍या थुंकीतून,

हवेमार्फत प्रसार, रोग्‍याच्‍या सान्निध्‍यात दीर्घकाळ असणे, रोग्‍याच्‍या वस्‍तू वापरणे.

लक्षणे:- दीर्घमुदतीचा खोकला, थुंकीतून रक्‍त पडणे, वजन कमी होणे, श्‍वासोच्‍छ्वास प्रक्रियेत त्रास

उपाय व उपचार:- 

  • बी. सी.जी. लस टोचून घ्‍यावी, रुग्‍णास इतरांपासून वेगळे ठेवावे. 
  • नियमित औषध घ्यावे.
  • DOT हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा.

🌀 

रोगाचे नाव:- कावीळ (Hepatitis)

 कारक:- विषाणू (हेपॅटीटीस A,B,C,D,E)

संक्रमणाचे माध्यम:- पाणी, रुग्‍णासाठी वापरलेल्‍या सुया, रक्‍तपराधन

 लक्षणे:- भूक मंदावणे, गर्दपिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी विष्‍ठा (मल)

 उपाय व उपचार:- पाणी उकळून व गाळून प्‍यावे, स्‍वच्‍छतागृहांचा वापर करण्‍यापूर्वी व नंतर हात साबणाने स्‍वच्‍छ धुवावेत.

🪷 

रोगाचे नाव:- अतिसार (हगवण)(Diarrhoea)

 कारक:- जीवाणू, विषाणू शिगेल्ला बॅसीलस एन्टामिबा हिस्टोलिटीका

 संक्रमणाचे माध्यम:-दूषित अन्‍न व पाणी 

लक्षणे:- पोटदुखी, पाण्‍यासारखे पातळ जुलाब

उपाय व उपचार:- अन्‍न झाकून ठेवावे, पाणी

उकळून व गाळून प्‍यावे, जलसंजीवनी (ORS) घ्‍यावी.

🌼 रोगाचे नाव:- पटकी (Cholera)

कारक:- जीवाणू (व्‍हिब्रियो कॉलरी) 

संक्रमणाचे माध्यम:- दूषित अन्न व पाणी 

लक्षणे:- उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायांत पेटके येणे.

उपाय व उपचार:- स्‍वच्‍छता राखावी,

उघड्यावरील अन्‍नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्‍यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्‍यावी.

🔥रोगाचे नाव:- विषमज्वर (Typhoid)

कारक:- जीवाणू (सालमोनेला टायफी)

संक्रमणाचे माध्यम:- दूषित अन्न व पाणी 

लक्षणे:- भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, 104° F पर्यंत ताप येणे.

उपाय व उपचार:- स्‍वच्‍छ व निर्जंतुक पाणी प्‍यावे, लसीकरण करून घ्‍यावे, सांडपाण्‍याची विल्‍हेवाट योग्‍य रीतीने करावी.

🦟 डेंग्यू (Dengue):-  

संक्रमणाचे माध्यम:- साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि डासांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन डासांची संख्या वाढते.

कारक:- एडिस इजिप्‍ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन -1-4 या विषाणूमुळे होतो.

लक्षणे:-

  1. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे.
  2. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणे.
  3. रक्तातील रक्तबिंबिका (platelets) यांचे प्रमाण कमी होणे. रक्तबिंबिका कमतरतेमुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणे.
🪈 माहीत आहे का तुम्हांला?
  1. हिवतापाचा प्रसार - ॲनाफिलीस डासाच्या मादीमुळे होतो,
  2. हत्तीरोगाचा प्रसार - क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो.
  3. ॲनाफिलिस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्‍छ पाण्यात असते, 
  4. क्युलेक्स डास प्रदूषित पाणी/ गटारे येथे असतो. 
🥁 स्वाईन फ्ल्यू :- 
संसर्ग होण्याची कारणे:-
  1.  स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो.
  2.  स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव व थुंकीतून होतो.
स्वाईन फ्लू ची लक्षणे
  1.  धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे.
  2. घसा खवखवणे, शरीर दुखणे. 
स्वाईन फ्लूचे निदान : स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो. ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी - एन.आय.व्ही.), पुणे’ व ‘राष्ट्रीय संचारी रोग संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस -  एन.आय.सी.डी) दिल्ली’ येथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे.
🔵 माहीत आहे का तुम्हांला?
  1. मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात स्वाईन फ्लू आजाराची प्रथम बाधा झाली. 
  2. स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्सा ए (H1N1) या विषाणुमुळे हा रोग होतो. 
  3. स्वाईन फ्लू हा रोग डुकरांमध्‍ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो.
  4.  डुकरांमध्‍ये वावरणाऱ्या व्‍यक्‍तीला या विषाणूंची बाधा होऊ शकते. 
⛑️ एड्स (AIDS):
दिर्घ रूप:- एड्स (AIDS - Acquired Immuno Deficiency Syndrome) 
कारक:- एड्स हा रोग HIV (Human Immunodeficiency Virus) या विषाणूमुळे मानवाला होतो.
लक्षणे:- यामध्‍ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्‍ती हळूहळू दुर्बल झाल्‍याने त्‍याला विविध रोगांची लागण होते.
निदान:- वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या
चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी आहे. 
लक्षणे:- एड्सची लक्षणे व्यक्तिसापेक्ष असतात. 
🧠 रेबीज (Rabies) : 
रेबीज हा विषाणुजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू
मज्जातंतूवाटे मेंदूत प्रवेश करतात. 
जलद्‍वेष (Hydrophobia) हे या रोगाचे
महत्त्वाचे लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास
जलसंत्रास असेही म्हणतात. 
रेबीज प्राणघातक रोग आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. 
कुत्रा चावल्यानंतर या आजाराची
लक्षणे 90 ते 175 दिवसांत दिसू लागतात. 
रेबीज रोगाची लक्षणे
  1.  2 ते 12 आठवडे ताप राहतो.
  2. अतिशयोक्‍ती करत वागणे.
  3.  पाण्याची भीती वाटणे.


                *इंद्रधनुष्य आणि मनुष्य या दोघां मध्ये एक साम्य आहे.* 
               *दोघां मध्ये विविध प्रकारचे रंग असतात.*
       *मात्र दोघां मध्ये फरक इतकाच की, इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने आणि
माणसाचे रंग अनुभवाने पाहता येतात.*
         
    *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.