इयत्ता 8 वी, विज्ञान, 5. अणुचे अंतरंग 1
▬▬▬۩۞۩▬▬▬
विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे🙏
▬▬▬۩۞۩▬▬▬
🍄 द्रव्य म्हणजे काय?
द्रव्य म्हणजे पदार्थ जो अत्यंत लहान कणांचा बनलेला आहे.
🌺 अणु म्हणजे काय?
- सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणु होय.
- मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणु असे म्हणतात.
- भौतिक व रासायनिक बदलात जो त्याची रासायनिक ओळख कायम ठेवतो त्यास अणु असे म्हणतात.
- रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू.
🌼 द्रव्यांचा सर्वात लहान घटक कोणता?
अणु हा द्रव्याचा सर्वात लहान घटक आहे.
🪴 रेणू हे कशाचे बनलेले असतात?
रेणू हे अणूंपासून बनलेले असतात.
🧠 तत्वज्ञ महर्षी कणाद:-
- द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, असे भारतीय तत्वज्ञ कणाद (ख्रिस्तपूर्व 6 वे शतक) यांनी सांगितले.
- द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना कणाद मुनींनी परमाणू (म्हणजे लहानात लहान कण) असे नाव दिले.
- महर्षी कणाद यांनी असेही मत मांडले की परमाणू अनाशवंत असतो.
🍓 ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस:-
- ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस (ख्रिस्तपूर्व 5 वे शतक) यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य लहान कणांचे बनलेले असते व ह्या कणांना कापता येत नाही.
- द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ॲटम असे नाव दिले. (ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा)
🌾 डाल्टनचा अणुसिद्धांत:-
- इ.स. 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टनच्या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचे बनलेलेअ सते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात.
- एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात.
- भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान भिन्न असते.
_&_&_&_&_&_&_
🤳 जे.जे. थॉमसन:-
- जे.जे. थॉमसन ह्या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ॠणप्रभारित e− कणांचा शोध लावला.
- थॉमसनने प्रयोग करून दाखवून दिले की अणूंच्या अंतरंगात असलेल्या ॠणप्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते.
_@_@_@_@_@_
🫵 थॉमसनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप:-
- अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉमसन यांनी सन 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय.
- ह्या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ॠणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात.
- पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनांवरील ॠणप्रभारामुळे होते. त्यामुळे अणू विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन होतो.
⚛️ रूदरफोर्डचा विकीरण प्रयोग:-
अर्नेस्ट रूदरफोर्ड यांनी अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले.
रूदरफोर्डयांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा (जाडीः 10^-4 mm) घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित α - कणांचा मारा केला.
सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रतिदीप्तीमान पडदा लावून त्यांनी α - कणांच्या मार्गांचा वेध घेतला. जर अणूंमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असेल तर धन प्रभारित α - कणांचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. अनपेक्षितपणे बहुसंख्य α -कण पत्र्यातून आरपार सरळ गेले, काही थोड्या α - कणांचे मूळ मार्गापासून लहान कोनामधून विचलन झाले, आणखी थोड्या α - कणांचे मोठ्या कोनातून विचलन झाले आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी एक α -कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला.
_#_#_#_#_#_#_
🔦 रूदरफोर्डचा विकीरण प्रयोग निरीक्षण:-
मोठ्या संख्येने आरपार गेलेले α - कण असे
दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. याचा अर्थ सोन्याच्या स्थायुरूप पत्र्यामधील अणुंच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे.
ज्या थोड्या α - कणांचे लहान किंवा मोठ्या कोनातून विचलन झाले त्यांच्या वाटेत अडथळा आला. याचा अर्थ अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता.
_@_#_@_#_@_#_@_
📢 रूदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप
_?_?_?_?_?_?_🌪️ रूदरफोर्डचा विकीरण प्रयोग निष्कर्ष:-
- अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते.
- केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते.
- केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन e− नावाचे ॠणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात.
- सर्व इलेक्ट्रॉनांवरील एकत्रित ॠणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभाराएवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.
- परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक ह्यांच्या दरम्यान पोकळी असते.
_"_"_"_"_"_"_"_"_
💡 सोडियम अणु आणि पिवळा प्रकाश:-
- घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते.
- पाण्यात सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून पिवळी ज्योत दिसते.
- रस्त्यावरील सोडिअम व्हेपर दिव्यांमधूनही पिवळ्या रंगाचा प्रकाश येतो.
ह्या सर्व उदाहरणांमध्ये सोडिअम अणूमधील
इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील कक्षेमध्ये जातो व पुन्हा आतील कक्षेमध्ये उडी मारून परत येताना ती ऊर्जा उत्सर्जित करतो. सोडिअम अणूच्या या दोन कक्षांच्या ऊर्जा पातळीतील फरक ठराविक असतात.
हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जेइतका असतो. म्हणून वरील तिन्ही उदाहरणांमध्ये तोच विशिष्ट पिवळा प्रकाश बाहेर पडल्याचे दिसते.
%©%©%©%©%
🎸. नील्स बोर
सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायीभाव स्पष्ट केला.
¢=¢=¢=¢=¢=¢
🌴 बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधारतत्वे:-
- अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन e− केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात.
- विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते.
- इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरकाइतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरकाइतकी ऊर्जा उत्सर्जित करतो.
$°$°$°$°$°$
बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप
सुमधुर स्नेह वंदन।प्रगति के इस दौर में हम इतने आगे निकल गए कि,हाथ में पकड़े मोबाइल की कीमत बगल में बैठे व्यक्ति से भी ज्यादा हो गई है।आपका हर दिनमंगलमय और सुखमय हो। 🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा