मुख्य सामग्रीवर वगळा

इयत्ता 8 वी, विज्ञान, 5. अणुचे अंतरंग 3

 

इयत्ता 8 वी, विज्ञान, 5. अणुचे अंतरंग 3

▬▬▬۩۞۩▬▬▬

विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे.🙏


WhatsApp Group Join Now

▬▬▬۩۞۩▬▬▬

केंद्रकात अनेक धनप्रभारित प्रोटॉन एकत्र असतात. केंद्रकातील न्यूट्रॉन्सचे एक कार्य काय असेल असे तुम्हांला वाटते ?

उत्तर:- केंद्रकीय बलाद्वारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्र ठेवणे.

:-:-:-:-:-:-:

अणूची संरचना व सूर्यमाला यांच्यात साधर्म्य आहे. सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती गुरूत्वीय बलामुळे फिरतात. अणुसंरचनेत कोणते बल कार्यरत असेल ?

उत्तर:- अणुसंरचनेत अनेक बल कार्यरत असतात.

  1. विद्युत चुंबकीय बल, 
  2. मजबूत केंद्रकीय बल 
  3. स्थितीक विद्युत बल (विद्युत बल) 
  4. कमकुवत केंद्रकीय बल
  5. गुरुत्व बल
_*_*_*_*_*_*_*_

* व्याख्या इलेक्ट्रॉन संरूपण:-
एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे
इलेक्ट्रॉन संरूपण होय.
+-+-+-+-+-+-+
प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते.
#-#-#-#-#-#

पहिल्या कवचातील (K कवच) इलेक्ट्रॉनांची ऊर्जा सर्वात कमी असते
------++------
*  K कवचा पुढील कवचामधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा कवचक्रमांकाप्रमाणे वाढत जाते.
+++++--+++++
*  मूलद्रव्याच्या अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण असे असते की त्यायोगे सर्व इलेक्ट्रॉनांची
एकत्रित ऊर्जा कमीत कमी असते. 
@-@-@-@-@

मूलद्रव्य, संज्ञा, अणुअंक, इलेक्ट्रॉन संरूपण आणि संयुजा

हायड्रोजन -  H - 1 - 1 - 1
हेलियम.    - He - 2 - 2- 0
लिथियम  - Li - 3 - 2,1 - 1
बेरिलियम - Be - 4 - 2,2 - 2
बोरॉन  - B - 5 - 2,3  - 3
कार्बन - C - 6 - 2,4 - 4
नायट्रोजन - N - 7 - 2,5 - 3
ऑक्सिजन - O - 8 - 2,6 - 2
फ्लुओरिन - F - 9 - 2,7 - 1
निऑन - Ne - 10 -  2,8 - 0
सोडियम -Na - 11 - 2,8,1 - 1
मॅग्नेशियम - Mg - 12 - 2,8,2 - 2
ॲल्युमिनियम - Al - 13 - 2,8,3 - 3
सिलिकॉन - Si - 14 - 2,8,4 - 4 
फॉस्फरस - P - 15 - 2,8,5 - 3
सल्फर / गंधक - S - 16 - 2,8,6 - 2
क्लोरीन - Cl - 17 - 2,8,7 - 1
अरगॉन - Ar - 18 - 2,8,8 - 0
पोटॅशियम - K - 19 -  2,8,8,1 - 1
कॅल्शियम - Ca - 20 - 2,8,8,2 - 2
ब्रोमीन - Br - 35 - 2,8,18,7 - 1
लोह/आयर्न
(Fe) - 26 - 2,8,14,2 - 2 / 3

संख्या स्वरूपातील इलेक्ट्रॉन संरूपण स्वल्पविरामांनी विलग केलेल्या अंकांनी दर्शवितात. यातील अंक ऊर्जेच्या
चढत्या क्रमाने असलेल्या कवचांमधील इलेक्ट्रॉन संख्या दाखवितात.
----------------
* इलेक्ट्रॉन संरुपणाचे रेखाटन 

------------------------
सोडियम

--------------------

-------------------
------------------
--------------------
रासायनिक नाव व रेणूसुत्रे 
  • हायड्रोजन -H2
  • क्लोरीन - Cl2
  • ब्रोमीन - Br2
  • आयोडीन - I2
  • नायट्रोजन - N2
  • ऑक्सिजन - O2
  •   पाणी - H20 
  • हायड्रोजन सल्फाईड - H2S
  • अमोनिया - NH3
  •  मिथेन - CH4
  •  हायड्रोजन ब्रोमाइड - HBr
  • हायड्रोजन फ्लोराईड - HF
  •  सोडियम हायड्रॉईड - NaH
  • हायड्रोक्लोरिक आम्ल - HCl
  • सल्फ्युरिक आम्ल - H2SO4
  • नायट्रिक आम्ल - HNO3
  • मॅग्नेशियम क्लोराईड - MgCl2
  • अल्युमिनियम क्लोराईड - AlCl3
&-&-&-&-&-&-&

 1. विविध अणूंमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावलेले असतात त्या कवचांच्या संज्ञा कोणत्या आहेत ?
उत्तर:- विविध अणूंमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावलेले असतात त्या कवचांच्या संज्ञा K, L, M, N,O,P,Q
®=®=®=®=®=®
2. सर्वात आतील कवचाची संज्ञा व क्रमांक काय आहे ?
उत्तर:- सर्वात आतील कवचाची संज्ञा K व
सर्वात आतील कवचाचा क्रमांक 1.
₹#₹#₹#₹#₹#₹#₹#₹

3. फ्लुओरीन अणूमधील इलेक्ट्रॉन ज्या कवचांमध्ये वितरित झालेले असतात त्यांच्या संज्ञा लिहा.
उत्तर:- फ्लुओरीनची संज्ञा - F
          इलेक्ट्रॉन संरूपण - 2, 7
           कवच K - 2 , L - 7

$=$=$=$=$

4. फ्लुओरीन अणूमधील सर्वांत बाहेरचे म्हणजे बाह्यतम कवच कोणते ?
उत्तर:- फ्लुओरीन अणूमधील सर्वांत बाहेरचे म्हणजे बाह्यतम कवच - L

€¥$€¥$€¥$€¥$

5. सोडिअम अणूमधील बाह्यतम कवच कोणते ?
उत्तर:- सोडिअम अणूमधील बाह्यतम कवच M.

₹#@₹#@₹#@₹

6.हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच कोणते ?
उत्तर:- हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच K.

¢^¢^¢^¢^¢^¢

संयुजा कवच :- अणूंची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात.
संयुजा इलेक्ट्रॉन :-  बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन.

-/-/-/-/-/-/-

संयुजा कशी ठरते?
  1. ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या चार किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्येएवढी असते.
  2.  ज्या मूलद्रव्यात चार किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात, ती उणीवेची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा असते.’’
--------++------


            *जपून ठेवणं महत्वाचं.*
          *मग ती सुगंधी फुलं असो, किंवा आयुष्य सुगंधीत करणारी माणसं...*

   🎸  *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...