इयत्ता 8 वी, विज्ञान, 5. अणुचे अंतरंग 2
▬▬▬۩۞۩▬▬▬
विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे.🙏
▬▬▬۩۞۩▬▬▬
⚛️ अणूची संरचना
केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू
बनतो.
अणू मध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन या तीन प्रकारच्या अवअणुकणांचा समावेश असतो.
0️⃣ केंद्रक
अणूचे केंद्रक धनप्रभारित असते.
अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते.
केंद्रकामध्ये प्राेटॉन व न्यूट्रॉन हे दोन प्रकारचे अवअणुकण असतात. एकत्रितपणे त्यांना न्युक्लिऑन म्हणतात.
-*-*-*-*-*-*-
🅿️ प्रोटॉन (p)
- प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अवअणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनांमुळे असतो.
- प्रोटॉनचा निर्देश ‘p’ ह्या संज्ञेने करतात.
- प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार +1e एवढा असतो. (1e = 1.6 × 10-¹⁹ कूलॉम) त्यामुळे केंद्रकावरील एकूण धनप्रभार ‘e’ ह्या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉन संख्येएवढे असते.
- अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनसंख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणूअंक असून तो ‘Z’ ह्या संज्ञेने दर्शवतात.
- एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1u (unified mass) इतके असते (1 डाल्टन म्हणजे 1 u =1.66 × 10 -²⁷ kg)
- हायड्रोजनच्या एका अणूचे वजनसुध्दा सुमारे 1 u इतके आहे.
📝 न्यूट्रॉन (n)
- न्यूट्रॉन हा विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवअणुकण असून त्याचा निर्देश ‘n’ ह्या संज्ञेने करतात.
- केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी ‘n’ ही संज्ञा वापरतात.
- 1 u इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात.
- एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 u इतके आहे, म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमानाइतकेच आहे.
🦅 इलेक्ट्रॉन (e-)
- इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अवअणुकण असून त्याचा निर्देश ‘e-’ ह्या संज्ञेने करतात.
- प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ॠणप्रभार (-1e) असतो.
- इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तूमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानता येते.
- अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. भ्रमणकक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने ‘कक्षा’ ह्या पदाऐवजी ‘कवच’ (shell) हे पद वापरतात.
- इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते.
- अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्या केंद्रकामधील प्रोटॉनसंख्येइतकीच (Z) असते. त्यामुळे विद्युतप्रभारांचे संतुलन होऊन अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.
✓®✓®✓®✓®✓®✓
* अणूत किती प्रकारचे अवअणुकण आढळतात ?
उत्तर:- अणुत प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन हे अवअणुकण आढळतात.
* कोणते अवअणुकण प्रभारयुक्त आहेत ?
उत्तर:- प्रोटॉन व इलेक्ट्रॉन हे अवअणुकण प्रभारयुक्त आहेत.
* केंद्रकांत कोणते अवअणुकण आहेत ?
उत्तर:- केंद्रकांत प्रोटॉन व न्यूट्रॉन हे अवअणुकण आहेत.
* केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कोठे असतात ?
उत्तर:- केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कवचात (shell) असतात.
=®=®=®=®=®=
* इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते.
-----**------
* अणुवस्तुमानांक:-
अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय.
अणुवस्तुमानांक ‘A’ ह्या संज्ञेने दर्शवितात.
अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित संकेतरूपात दर्शविण्याची पद्धत पुढे दिली आहे.
A
Zसंज्ञा
उदा.
12
6C ह्या चिन्हांकित संकेताचा अर्थ
कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनसंख्या 6 व कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. यावरून हे सुद्धा समजते की कार्बनच्या केंद्रकात (12-6) म्हणजे 6 न्यूट्रॉन आहेत.
=^=^=^=^=^=
* ऑक्सीजनची संज्ञा ‘O’ असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सीजनचा अणुअंक (Z) व अणुवस्तुमानांक (A) ठरवा, तसेच त्यांची चिन्हांकित संकेताने मांडणी करा.
उत्तर:-
ऑक्सीजनचा अणुअंक (Z) = 8
अणुवस्तुमानांक (A) = p + n
= 8 +8
= 16
ऑक्सीजनची चिन्हांकित संकेताने मांडणी
A
Z संज्ञा 16
8 C
*-*-*-*-*-*-*
* कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या अणूत किती इलेक्ट्रॉन असतील?
उत्तर:- कार्बनचा अणुअंक 6 आहे म्हणून कार्बनच्या अणूत 6 इलेक्ट्रॉन असतील.
कारण p = e.
-:-:-:-:-:-:-:-:-:-:-
* सोडिअमच्या अणूत 11 इलेक्ट्रॉन आहेत. सोडिअमचा अणुअंक किती ?
उत्तर:- सोडिअमच्या अणूत 11 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून सोडिअमचा अणुअंक 11 आहे कारण p = e.
+-+-+-+-+-+-+
* मॅग्नेशिअमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 12 व 24 आहे. चिन्हांकित संकेतामध्ये तुम्ही ते कसे दर्शवाल ?
उत्तर
24
12Mg
@-@--@-@-@-@
* कॅल्शिअमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 20 व 40 आहे. यावरून कॅल्शिअमच्या केंद्रकात किती न्यूट्रॉन असतील ते काढा.
उत्तर:-
अणुअंक = Z = 20
अणुवस्तुमानांक = A = 40
n = A - Z
= 40 - 20
= 20
•©•©•©•©•©•©•
इलेक्ट्रॉन वितरण:-
- बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते.
- अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच, त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच म्हणतात.
- कवचांच्या क्रमांकासाठी ‘n’ ही संज्ञा वापरतात. n = 1,2, 3, 4, ... या क्रमांकानुसार कवचांना K, L, M, N,.... ह्या संज्ञांनी संबोधण्यात येते.
- प्रत्येक कवचात जास्तीत जास्त ‘2n^ 2’ या सूत्राने मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन असू शकतात.
- ‘n’ चे मूल्य वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते.
😊 सुमधुर स्नेह वंदन।🙏
गाड़ी में अगर ब्रेक नहीं तो
दूर्घटना निश्चित है|
जीवन में संस्कार और
मर्यादा नहीं है तो
मनुष्य का पतन निश्चित है।
आपका🫵 हर दिन
मंगलमय और सुखमय हो।🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा