मुख्य सामग्रीवर वगळा

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी सांघिक ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले🎷

 


मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी सांघिक ऐतिहासिक कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले.



भारतासाठी मिश्र सांघिक ब्राँझ मेडल 🙏🎷

कालची बातमी होती मनू-सरबज्योत 'कांस्य' च्या शर्यतीत, कालच्या या बातमीचे आज आनंदाच्या बातमीत रूपांतर झाले.

पॅरिस ऑलिम्पिक गेम्स मध्ये मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक ब्राँझ मेडल जिंकले.
भारतीय जोडीने 16-10 ने कोरियन जोडीला हरवले.
ऑलम्पिक शूटिंगमध्ये भारताला एकूण सहा पदक मिळाले आहेत.
मनू ने याच महिन्यात 28 जुलै ला पॅरिस ऑलिम्पिक मध्ये दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात कास्यपदक जिंकले होते. अंतिम फेरीत मनू ने एकूण 221.7 गुण मिळवून प्रथमच कास्यपदक प्राप्त केले होते. 

2020 च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिचे पिस्तूल तुटले होते त्यामुळे तिला पदक जिंकता आले नाही.

प्ले ऑफमध्ये दक्षिण कोरियाचा पराभव करून या जोडीने भारतासाठी दुसरे पदक जिंकले.
विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे भारताच्या इतिहासात एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली खेळाडू ठरली.

भारतीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांनी X वर लिहिले "आमचे नेमबाज सतत आमचा अभिमान वाढवत आहेत".

आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे
 2 ऑगस्ट रोजी 25 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेत मनू भाकर भाग घेईल. मनू ने जर यात पदक मिळवले तर ती पहिली भारतीय अशी खेळाडू ठरेल जिने तीन ऑलिम्पिक पदके एकाच ऑलिंपिक मध्ये जिंकले. सर्व भारतीय यासाठी मनोमन प्रार्थना नक्कीच करतील.
Good luck for the third Medal. 

अभिनव बिंद्रा यांनी 'X' वर एक पोस्ट केली, त्यात त्यांनी लिहिले आहे की, " मनु आणि सरबजोत: तुम्ही ते केले आहे जे यापूर्वी कोणत्याही भारतीय नेमबाजी जोडीने केले नाही. भारताचे पहिले ऑलिम्पिक नेमबाजी संघ पदक. या क्षणाचा आनंद घ्या, तुम्ही ते मिळवले आहे! अभिमान आहे,"



             
              *मित्र गरज म्हणून नाही, 
तर सवय म्हणून जोडा...!*
              *कारण "गरज" संपली जाते, पण "सवयी" कधीच सुटत नाहीत...!!*

    *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...