मुख्य सामग्रीवर वगळा

9 th Science, Current Electricity 2, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 2.

 

9 th Science, Current Electricity 2, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 2.

📝 आपल्या what's App समुहात सामील होण्यासाठी खालील👇 लिंक🔗 ला स्पर्श करा. 

👉 माहिती विज्ञानाची 🎷


🪘 विद्युतधारा (Electric Current)

  व्याख्या:- वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉन्सचा e^- प्रवाह म्हणजे विद्युतधारा होय. 

विद्युतधारेचे मूल्य (I) एकक कालावधीत (t) वाहकातून वाहणाऱ्या विद्युतप्रभाराएवढे (Q) असते.

  वाहकाच्या काटछेदातून t या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार Q असेल, तर

विद्युतधारा = I = Q / t    इतकी असते.

विद्युत प्रभाराचे SI पद्धतीतील एकक कूलोम (C) आहे.

 विद्युतधारा ॲॅम्पिअर (A) या एककात व्यक्त करतात.

"""""""------""""""

 ⚡ Electric current

Definition:- An electric current is the flow of electrons e^- through a conductor.

 Quantitatively, current (I) is defined as the charge (Q) passing through a conductor in unit time (t).

If charge Q is flowing through cross-section of a conductor in time t then the 

current = I = Q / t

The unit of electric charge (Q) in SI units is Coulomb (C). 

The unit of Current (I) is expressed in Ampere (A). 

----+++---

🐠 एका इलेक्ट्रॉनवरील प्रभार 

1.6 ×10^-19 कूलोम (C) असतो.

🥀 The charge of one electron is  1.6 x 10^-19 C.


####$$###

🌜 विद्युतधारा दिशा:- 

इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरी विद्युतधारा दर्शवण्याची संकेतमान्य दिशा इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे धन टोकाकडून ऋण

टोकाकडे असते.म्हणजे इलेक्ट्रॉन वहन दिशा विद्युत घटाच्या -ve टोकापासून +ve टोकाकडे असते. कारण इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतात.

+++++------++++++

🙃Current direction:- 

Even though, electrons move from negative end to positive end, conventionally, the

direction of current flow is taken to be opposite of the direction of flow of electrons i.e. from the +ve end to the  –ve end of a cell.

::;;:::::---::::::


✈️ॲॅम्पिअर (A) : 

वाहकातून एका सेकंदास (t) एक कूलोम (C) इतका विद्युतप्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युतधारा एक ॲम्पिअर आहे.

   1 A =  1 C / 1 s


@@@@_____@@@@


🪂 Ampere

One ampere current is said to flow in a conductor if one Coulomb charge flows through it every second. 

1 A = 1 C / 1 s


_______&&____


🎻 विद्युतरोध (Resistance) आणि ओहमचा नियम.

ओहमचा नियम (Ohm’s law )

  वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युतधारा (I) व त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) यांच्यामधील संबंध जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येतो.

नियम:-

वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते.

  I ∝ V

  I = kV ( k = स्थिरांक)

  I × 1/K = V 

(1/K = R = वाहकाचा रोध)

  I × R = V 

अर्थातच V = IR 

किंवा 

R= V/I

या सूत्रास ओहमचा नियम असे म्हणतात .

  वरील सूत्रावरून आपल्याला रोधाचे SI एकक मिळविता येते. विभवांतर व्होल्ट (V) व विद्युतधारा ॲम्पिअरमध्ये (A) मोजतात म्हणून रोधाचे SI एकक V/I हे येईल यालाच ओहम असेही म्हणतात. 

ओहम हे एकक Ω या चिन्हाने दर्शविले जाते.

∴ 1 व्होल्ट / 1 ॲॅम्पिअर = 1 ओहम (Ω)

🥇एक ओहम रोध : वाहकाच्या दोन टोकांमध्ये एक व्होल्ट (1 V )विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून एक ॲम्पिअर (1A) विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध एक ओहम (1Ω) असतो. 

🔥 वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे

वाहकाची लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान व त्याचे द्रव्य होय.

😺 Resistance and Ohm’s Law

Ohm’s law

The relationship between the current flowing through a wire (I) and the potential difference across its ends (V) can be obtained from the law that was given by the German scientist George Simon Ohm.

Law:- 

If the physical state of a conductor remains constant, the current (I) flowing through it is directly proportional to the potential difference (V) between its two ends.

I  ∝ V

I = kV

 ( k = constant of proportionality)

I × 1/ K = V

 ( 1/ K = R =

Resistance of the conductor )

I × R = V 

Hence V = IR 

or 

R= V / I

This is known as Ohm’s law.

We can obtain the SI unit of resistance from the above formula. 

Potential difference and current are measured in Volts and Amperes respectively. The unit of resistance is called Ohm. It is indicated by the symbol Ω.

1 volt/ 1 Ampere = 1 Ohm (Ω)


🥇 Resistance (R) of one Ohm : If one Ampere (A) current flows through a conductor when

one Volt (1V) potential difference is applied between its ends, then the resistance of the conductor is one Ohm (Ω)

🔥Physical state of a conductor means its length, area of crosssection, temperature and the material it is made up of.


🌅🌅

*🙏 सुमधुर स्नेह वंदन।🙏*

*“अच्छे लोगों का 

हमारी जिन्दगी में आना 

हमारा सौभाग्य है 

और उन्हें संभालकर रखना 

हमारी योग्यता है”।*

*🙏आपका हर दिन 

मंगलमय और सुखमय हो।🙏

*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.