मुख्य सामग्रीवर वगळा

10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 27 मे रोजी 1 वाजता 🎷.

 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 27 मे रोजी 1 वाजता 🎷.




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10  वी परीक्षेचा निकाल 
27 मे 2024 दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतसळावर सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. 
इयत्ता 10 वी म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र मार्च 2024 परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येतील. विद्यार्थ्यांना सदर माहितीची प्रिंटआउट पण घेता येईल. पीडीएफ रूपात पण रूपांतरित करून मार्क मेमो घेता येईल. 
10 वी बोर्ड निकाल हा बेस्ट ऑफ फाईव्ह/ best of 5 प्रमाणे दर्शवतात. याचा अर्थ सहा विषयांपैकी ज्या एका विषयात कमी गुण आहेत ते गुण वगळले जातात, उर्वरित पाच विषयांच्या गुणांची बेरीज होते त्यास 500 ने भाग दिला जातो.

गुणपडताळणी:-
परीक्षेत पविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती  पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून 
अर्ज करून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पण यासाठी आवश्यक अटी /शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत.

मुदत:- 
गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार दिनांक 28 5 2014 ते मंगळवार दिनांक 11 6 2024 पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना करता येईल. यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.

🥁 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येईल. 🎷

सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना Best of luck 🎷 

*"हसतमुख लोकांचा सहवास 
अत्तराच्या दुकाना सारखा असतो 
काहीही खरेदी केले नाही तरी 
मन सुगंधीत तथा उल्हासीत होते"*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...