10th Science, part II environmental management, 10 वी विज्ञान भाग 2, पर्यावरणीय व्यवस्थापन 3.
दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे. जॉईन होण्यासाठी निळ्या लिंक ला स्पर्श करावा.
What's app link 👇
--> 🔴 माहिती विज्ञानाची 🎷 🔴
ग्रुप वर जॉईन का व्हावे? याचे कारण....
- आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.
- दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो.
- एखाद्याने प्रश्न विचारला व आपल्याला त्या प्रश्नाचे जर उत्तर देता आले तर तो आनंद वेगळाच असतो.
- तुम्ही विद्यार्थी आहात तर शिकले पाहिजे, वयाने मोठे भाऊ-बहीण आहात तर लहान मुलांना अभ्यासात मदत करता आली पाहिजे, पालक आहात तर मुलांचा अभ्यास घेता आला पाहिजे, आजोबा/ आजी आहात तर नातवाच्या प्रश्नांचे उत्तर देता आले पाहिजे.
- विज्ञानातील बराचसा भाग हा शाश्वत आहे, त्यामुळे बरेच विज्ञान आपल्याला आले पाहिजे.
- देशाची प्रगती करायची असेल तर शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत. शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी विज्ञान समजले पाहिजे.
- आणखीन कितीतरी कारणे आपणास सांगता येतील, यासाठी सस्नेह निमंत्रण🙏🎷.
आज आपण प्रदूषणा संदर्भात माहिती घेऊ.
✍️ प्रदूषणाचे प्रकार कोणते?
उत्तर: जल प्रदूषण, हवा प्रदूषण, भू प्रदूषण हे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत.
याचबरोबर प्लास्टिक प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, इ. प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत.
Today we will learn about pollution.
🦘 Which are the types of pollution?
Ans: water pollution air pollution and soil pollution these are the main types of pollution.
Noise pollution, plastic pollution, light pollution, radioactive pollution etc. are also types of pollution.
🥁 किरणोत्सारी प्रदूषण
- नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन्ही प्रकारे घडून येणारे किरणोत्सारी प्रदूषण खूप घातक आहे.
- नैसर्गिक किरणोत्सार: अल्ट्राव्हायोलेट प्रारणे/ अतिनील प्रारणे (UV), इन्फ्रारेड प्रारणे (IR).
- मानवनिर्मित किरणोत्सार: क्ष किरण/ एक्स रे, किरणोत्सारी घड्याळ, अणुभट्ट्यामधून होणारा किरणोत्सार.
- चेर्नोबिल, विंड्स्केल, आणि थ्री माईल आयलंड अशा मोठ्या दुर्घटना जगात घडलेल्या आहेत. या दुर्घटनांमुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झाल्या आहेत.
🎷 Radioactive pollution
- Naturally man made radioactive pollution is very dangerous.
- Natural radiations: by natural process is such as UV means ultraviolet radiations and IR means infrared radiations/ thermal radiation.
- Man made or artificial radiations: x-rays, radioactive watches and radiations emitted from atomic energy plants.
- On the international level Chernobyl, Windscale, and Three Miles Island mishaps are major mishaps. Thousands of peoples have been affected for long term by these mishaps.
🎺 किरणोत्सारी प्रदूषणाचे दुष्परिणाम
- X-ray च्या उच्च प्रारणांमुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात.
- शरीरातील ऊतींचा नाश होतो.
- जनुकीय बदल घडतात.
- दृष्टीवर हानीकारक परिणाम होतो.
- जनुकात अनुवंशिक विकृती, व्यंग, अपंगत्व, वंध्यत्व, रक्तदोष, मतिमंदत्व, त्वचेचे विकार, रोगप्रतिकारशक्तीचा नाश आणि मृत्यू असे दुष्परिणाम किरणोत्सारी प्रदूषणामुळे संभवतात.
🔴 Effects of radiations
- The effects of radiations are as follows
- Cancerous ulceration occurs due to higher radiations of X-rays.
- Tissues in the body are destroyed.
- Genetic changes occur.
- Vision is adversely affected.
- Radiation can damage DNA in cells and weakening the functioning of tissues and organs.
- Due to radiations genetic abnormalities in genes, disabilities, infertility, anemia, mental retardation, skin diseases caused.
✍️ फुलपाखरे 🦋 पर्यावरण संतुलनामध्ये काय काम करतात.
- रंगीबेरंगी फुलपाखरे मनाला प्रसन्नता देतात, त्याचसोबत त्या परिसराचे सुशोभीकरण होते.
- फुलपाखरे असलेला परिसर हा संतुलित असल्याचे मानले जाते.
- फुलपाखरामुळे परागीभवनाची क्रिया उत्तम घडते या क्रियेतून वनस्पतीचे प्रजनन घडून येते. फुलपाखरे कीटक यांच्या परागीभवनाच्या क्रियेतून वनस्पतींची संख्या जलद वाढते.
- फुलपाखरे काही उपद्रवकारक कीटक त्यांचे भक्ष म्हणून फस्त/खातात करतात.
🦘 How do butterfly 🦋 contribute to environmental balance?
- Ans: Due to beautiful colour butterflies we feel the environment become pleasant and joyful.
- The presents of butterflies indicate the health good of the environment.
- The ecosystem is said to be balance if there is presence of butterflies in the surroundings.
- Best pollination is carried out by butterflies and insects. The flora is increased due to good reproduction in plants.
- Many weeds are consumed by the butterflies as their food. Some butterflies consume harmful insects as their prey.
🥁 देवराई (Sacred grove)
- देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे‘देवराई’.
- देवराई परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वनखात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘अभयारण्य’च होय. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते.
- भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजके आहे.
- भारतात 13000 पेक्षा अधिक देवराया नोंदविलेल्या आहेत.
🎷 Sacred Groves
- The forest conserved in the name of god and considered to be sacred is called as sacred grove.
- These ‘sanctuaries’ conserved by the society and not by the government forest department.
- As it has been conserved in the name of god, it has special protection.
- These clusters of thick forests are present not only in Western Ghats of India but also in the entire country.
- More than 13000 sacred groves have been reported in India.
🦚 जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल?
- दुर्मीळ जातीच्या सजीवांचे संरक्षण .
- अनेक राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करूण .
- काही क्षेत्रे ‘राखीव जैवविभाग’ म्हणून घोषित केल्यावर.
- विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करूण .
- प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करूण .
- कायद्यांचे तंतोतंत पालन करूण.
- पारंपरिक ज्ञानाची कायम नोंद करून.
🚗 How can biodiversity be conserved?
- Protecting the rare endangered species of organisms.
- Establishing many national parks and sanctuaries.
- Declaring some regions as ‘bioreserves’.
- Projects for conservation of special species.
- Conserving all plants and animals.
- Observing the rules.
- Maintaining permanent record of traditional knowledge.
*मुस्कुराहट का रंग बडा प्यारा होता है, इसिलिये हर पल मुस्कुराना चाहिये, कभी अपने लिये तो कभी अपनोंके लिये ।*
*Everything is easy when you are busy, but nothing is easy when you are lazy.*
*आयुष्यात संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान, सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्या लोकांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते.*
🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा