मुख्य सामग्रीवर वगळा

10th Science, part II environmental management, 10 वी विज्ञान भाग 2, पर्यावरणीय व्यवस्थापन 2

 


10th Science, part II environmental management, 10 वी विज्ञान भाग 2, पर्यावरणीय व्यवस्थापन 2.



दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे.

What's app link 👇


--> 🔴 माहिती विज्ञानाची 🎷 🔴


ग्रुप वर जॉईन का व्हावे? याचे कारण....

आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.

दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो.

एखाद्याने प्रश्न विचारला व आपल्याला त्या प्रश्नाचे जर उत्तर देता आले तर तो आनंद वेगळाच असतो.

तुम्ही विद्यार्थी आहात तर शिकले पाहिजे, वयाने मोठे भाऊ-बहीण आहात तर लहान मुलांना अभ्यासात मदत करता आली पाहिजे, पालक आहात तर मुलांचा अभ्यास घेता आला पाहिजे, आजोबा/ आजी आहात तर नातवाच्या प्रश्नांचे उत्तर देता आले पाहिजे. 

 विज्ञानातील बराचसा भाग हा शाश्वत आहे, त्यामुळे बरेच विज्ञान आपल्याला आले पाहिजे.

देशाची प्रगती करायची असेल तर शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत. शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी विज्ञान समजले पाहिजे.

आणखीन कितीतरी कारणे आपणास सांगता येतील, यासाठी सस्नेह निमंत्रण🙏🎷.


आज प्रथम परिसंस्थेचा अभ्यास करू.

परिसंस्था ही दोन घटकांमध्ये विभागते 

1. जैविक घटक 

2. अजैविक घटक

जैविक घटकांचे दोन भाग पडतात :- 

  • स्वयंपोषी 
  • परपोषी

सर्व हरित वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात.


परपोशीचे दोन प्रकार करता येतात 

  • भक्षक 
  • विघटक

सर्व प्राणी हे परपोषी असून ते भक्षक आहेत.

भक्षकांचेही काही प्रकार करता येतात:

  1. प्राथमिक भक्षक 
  2. द्वितीय भक्षक 
  3. तृतीय भक्षक 
  4. सर्वोच्च भक्षक


जीवाणू हे मृत वनस्पती व प्राणी यांचे विघटन करतात म्हणून त्यांना विघटक म्हणतात. विघटन करणाऱ्यांना मृतोपजीवी असेही म्हणतात


अजैविक घटकांचे दोन प्रकार पडतात

  •  भौतिक घटक 
  •  रासायनिक घटक.

भौतिक घटकांमध्ये पाणी, माती, हवा, सूर्यप्रकाश, बाष्प, इत्यादी घटक मोडतात.


रासायनिक घटकांचे दोन गटात वर्गीकरण करता येते 

  • सेंद्रिय पदार्थ 
  • असेंद्रिय पदार्थ.


सेंद्रिय पदार्थांमध्ये सर्व पोषणद्रव्यांचा समावेश होतो जसे :

कर्बोदके प्रथिने ,स्निग्ध पदार्थ इत्यादी.


असेंद्रिय पदार्थांमध्ये नायट्रोजन N2, ऑक्सिजन O2,  हायड्रोजन H2,  कॅल्शियम Ca ,सोडियम Na, लोह Fe, पोटॅशियम K, आयोडीन I2, इत्यादी पदार्थांचा समावेश होतो.


Today let's first study the ecosystem.

Ecosystem is divided into two components :-

  • Biotic components 
  • Abiotic components.


Biotic components are divided into two groups :-

  • Autotrophic 
  • Heterotrophic.                                 

All green plants are producers means they are autotrophic in nature.

Heterotrophic is divided into two 

  • Consumers 
  • Decomposers.

All animals are consumers they are divided into           

  1. Primary consumers 
  2. Secondary consumer 
  3. Tertiary consumer and 
  4. Apex consumer.

 Bacteria are decomposers. They decomposes dead plants and animals so they are heterotrophic in nature.Decomposers are also known as saprophytes.

Abiotic components are divided into two factors 

  • Physical factors 
  • Chemical factors.

Water, soil, air, water vapour, sunlight, minerals, these are the physical factors.

Nutrients and minerals are included in chemical factors.

They further divided into

  • Organic substances 
  • Inorganic substances 


Nutrients are organic compounds.

Examples of organic compounds are carbohydrates proteins and fats.

Nitrogen N2, Oxygen O2,  hydrogen H2, iron Fe, calcium Ca, sodium Na,  potassium K, iodine I, etc are the inorganic substances.


उताऱ्यावर आधारित प्रश्न :-

दक्षिण भारतामध्ये विविध राज्यांत मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे🦗 येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरीता बेडकांची🐸 संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही 🐉 तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर, 

विचार करा. या परीच्छेदावरी आधारित प्रश्न.

1. भाताच्या पिकांवर काय परिणाम होईल?

उत्तर: बेडकांची संख्या कमी झाली तर नाकतोड्यांची संख्या वाढेल. यामुळे भारताच्या पिकावर याचा विपरीत परिणाम होईल, भाताचे पीक कमी येईल.

2. कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल?

उत्तर:अचानक बेडकांची संख्या कमी झाली तर बेडकावर अवलंबून असलेल्या सापांची संख्या कमी होईल.

सापांची संख्या कमी झाल्यामुळे उंदीर वाढतील.

बेडकांची संख्या कमी झाल्यामुळे प्राथमिक भक्षक नाकतोड्याची संख्या वाढेल.

3. एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होईल?

उत्तर: बेडूक नष्ट झाले तर परिसंस्थेतील संतुलन बिघडेल. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या अन्नसाखळीच्या कड्या नष्ट होतील. अचानक बदलामुळे परिसंस्थेचा तोल संपुष्टात येईल.


Paragraph based question.

Paddy is cultivated on large scale in various states of South India. Paddy fields are frequently attacked by grasshoppers. Similarly, frogs 🐸 are also present in large number in the mud of paddy fields, to feed upon grasshoppers 🦗  and snake🐉  are also present there into feed upon their favourite food- frogs. However, if frog population declines all of a sudden,

1. What will be the effect on paddy crop?
Ans: If the population of frog decline then there will be rise in population of grasshoppers. Paddy fields are attacked by grasshoppers.

2. Number of which consumers will decline and which will increase?

Ans: If there is decline in the number of frogs, snakes level will also decline due to starvation.

As snakes reduced rats other rodents from nearby area would also rise.

As frog population decline suddenly, grasshopers will increases. As number of grasshopper increases, the paddy production will be reduced.


What will be overall effect on that ecosystem?

Ans: If frog population decline suddenly, there would be imbalance of entire ecosystem.

As the pre and Predator populations will change, the food chain will come to an end.


पर्यावरणामध्ये कोण कोणती चक्र असतात? त्या चक्रांची उदाहरणे द्या.

उत्तर: पर्यावरणात अवसादन चक्र आणि वायु चक्र अशी दोन प्रकारची जैव-भू-रासायनिक चक्रीय असतात.

वायु चक्रात ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, कार्बन डाय-ऑक्साइड चक्र इत्यादींचा समावेश होतो.

अवसादन चक्रात फॉस्फरस चक्र, लोहचक्र, कॅल्शियम चक्र, गंधकचक्र इत्यादींचा समावेश होतो.


Which cycles are operated in environment? Give examples.

Ans: Bio-geo-chemical cycles are operated in environment.

Bio-geo-chemical cycles are of two types.

Sedimentary cycle: Phosphorus cycle, sulphur cycle, iron cycle and calcium cycle etc.

Gaseous cycle: Oxygen cycle, nitrogen cycle, carbon dioxide cycle etc.


"आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी पृथ्वी आपण सांभाळून ठेवली पाहिजे. पृथ्वी ही आपल्याला वारसा हक्काने मिळालेली संपत्ती नसून पुढच्या पिढीला आपल्याकडून उसनवार मिळाली आहे ही भावना आपल्यात हवी. कारण निसर्ग टिकला तरच मानव टिकेल."


"We must conserve Earth for ourselves and for future generations. The planet earth was given to us on lease and not as an ancestral property from our ancestors. If the environment is in proper condition then human existence is possible."


                *आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते. त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते.*

                *स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.*

आपला दिवस आनंदी जावो.🎷


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं