10th Science, part II environmental management, 10 वी विज्ञान भाग 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.
दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे.
What's app link 👇
--> 🔴 माहिती विज्ञानाची 🎷 🔴
ग्रुप वर जॉईन का व्हावे? याचे कारण....
- आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.
- दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो.
- एखाद्याने प्रश्न विचारला व आपल्याला त्या प्रश्नाचे जर उत्तर देता आले तर तो आनंद वेगळाच असतो.
- तुम्ही विद्यार्थी आहात तर शिकले पाहिजे, वयाने मोठे भाऊ-बहीण आहात तर लहान मुलांना अभ्यासात मदत करता आली पाहिजे, पालक आहात तर मुलांचा अभ्यास घेता आला पाहिजे, आजोबा/ आजी आहात तर नातवाच्या प्रश्नांचे उत्तर देता आले पाहिजे.
- विज्ञानातील बराचसा भाग हा शाश्वत आहे, त्यामुळे बरेच विज्ञान आपल्याला आले पाहिजे.
- देशाची प्रगती करायची असेल तर शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत. शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी विज्ञान समजले पाहिजे.
- आणखीन कितीतरी कारणे आपणास सांगता येतील, यासाठी सस्नेह निमंत्रण🙏🎷.
आज आपण परिसंस्था, पर्यावरण, पर्यावरण संवर्धन, जैवविविधता या मुद्द्यांचा अभ्यास करू.
प्रथम परिसंस्थेचे विविध घटक पाहू.
परिसंस्थेचे विविध घटक खालील प्रमाणे जैविक घटक: यात सर्व प्रकारच्या सजीवांचा समावेश होतो. जसे वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव.
अजैविक घटक: जे सजीव नाहीत असे सर्व जसे सूर्यप्रकाश, पाणी, हवा, माती, दगड, पाण्याची वाफ इत्यादी.
Today we will study the issues of ecosystem, environment, environment conservation, biodiversity.
Which are the different components of ecosystem?
Ans: The different components in the ecosystem are as follows:
- Biotic components: In this all types of living organisms are present such as plants, animals and micro organisms ex. bacteria fungi etc.
- Abiotic factors: Sunlight, water, air, soil, humidity, temperature, etc.
परिसंस्था म्हणजे काय?
उत्तर: एखाद्या भौगोलिक परिसरात असणारे जैविक घटक,अजैविक घटक आणि त्यांच्यात असणाऱ्या आंतरक्रिया यातुन परिसंस्था तयार होते.
What is ecosystem?
Ans: A geographic area where biotic and abiotic factors and their interactions with each other is called as ecosystem.
भक्षकांचे प्रकार कोणते? भक्षकांचे प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात?
उत्तर:
प्राथमिक भक्षक,
द्वितीय भक्षक,
तृतीय भक्षक किंवा सर्वोच्च भक्षक असे भक्षकांचे प्रकार पडतात.
भक्षकांचे प्रकार हे निरनिराळ्या पोषण पातळीप्रमाणे असतात.
Which are the types of consumers? What are the criteria for their classification?
Ans:
primary consumers,
secondary consumers,
tertiary consumers or Apex consumers these are the different types of consumers.
Classification of consumers is based on trophic level to which they belong.
झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा?
उत्तर: सर्व सजीवांना सहसा पिण्याचे पाणी लागतेच, पक्षी त्यांना लागणारे पिण्याची पाणी हे तलावातून घेतात.
तलावातील पाण्यामुळे झाडाची वाढ व्यवस्थित होते व त्यामुळे त्या झाडावर पक्षी वास्तव्य करून राहतात.
झाडावरील पक्षांना तलावातील जीव जसे झिंगे, मासे, बेडूक इत्यादी. भक्ष मिळवण्यासाठी झाडावरील पक्षी हे तलावाच्या नजीक राहतात.
What may be the relationship between Lake and birds on tree?
Ans: Every organism need water for drinking purpose.
Due to Lake water three properly grows and birds take shelter of the tree.
The birds on the tree depend on the lake organism such as prawn, fish, frog etc.
अन्नसाखळी व अन्नजाळे यामध्ये काय फरक आहे?
उत्तर: प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये सतत अंतरक्रिया चालू असते. ही जी अंतरक्रिया असते त्याच्या क्रमाला अन्नसाखळी म्हणतात.
अन्नसाखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक व सर्वोच्च भक्षक अश्या चार ते पाच कड्या असतात, जर अशा कड्या सरळ रेषेत असतील तर त्यास अन्नसाखळी म्हणतात.
जर एकापेक्षा अधिक अन्नसाखळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्या तर त्यास अन्नजाळे म्हणतात. अन्नजाळे हा गुंतागुंतीचा आणि अनेक शाखा असलेला अन्नसाखळ्यांचा समूह आहे.
What is the difference between food chain and food Web?
Ans: There are always interactions between producers, consumers and decomposers. The above sequence of feeding interactions is called food chain.
There are links between tropic level consisting the producers, primary consumers, secondary consumers, tertiary consumers, Apex consumers etc.In every food chain we can
see such types of link. If the links are in linear sequence then it is called food chain.
When network of many small food chains are interconnected then food web is formed. It means that food web is formed when many food chains are interwoven.
वर्षानुवर्षे जंगलातील पालापाचोळा, पडलेली झाडे इत्यादी तसेच गाव परिसरातील मृत जनावरे यांचे विघटन झाले नसते तर...
उत्तर: विघटन ही एकच क्रिया अशी आहे ज्यातून जंगलातील पालापाचोळा, पडलेली झाडे, मृत जनावरांचे शरीर यांचे पुन्हा निसर्गात विलीनीकरण होते. जर मृत सजीवांचे विघटन झाले नाही तर पृथ्वीवर या मृत सजीवांचा ढीग साचून राहील. विघटन न झाल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडेल. कारण मृत शरीरात मूलद्रव्य अडकून पडली तर रसायन चक्रावर परिणाम होईल. विघटक हे निसर्गचक्र संतुलित ठेवतात.
If fallen foliage in forest, dead trees, and carcasses in and around village had not been decomposed for years...
Ans: If decomposition halts for some years, the entire earth will be covered by heaps of unwanted garbage of carcasses. Due to this the entire balance of nature would be lost, because the cyclic flow of elements will halt. The one and only process of decomposition releases elements and molecules trapped In the bodies of dead organisms can be returned back to nature.
"इस संसार मे हर वस्तू व प्राणी महत्त्वपूर्ण है, अभिमान करणा व्यर्थ है."🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा