10th part II, life processes in leaving organism part 2.7, 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2.7
10th part II, life processes in leaving organism part 2.7, 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2.7
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा👇
*╭✺༺☬༒☬༻✺╮*
🥁 आर्तवचक्र / ऋतुचक्र (Menstrual cycle)
- व्याख्या: यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28-30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होणाला आर्तवचक्र/ऋतुचक्र म्हणतात.
- आर्तवचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून चार संप्रेरकांद्वारेतिचे नियंत्रण होते.
- संप्रेरके: पुटीका ग्रंथी संप्रेरक (Follicle Stimulating Hor-mone), ल्युटीनायझींग संप्रेरक (पितपिंडकारी संप्रेरक / Luteinizing Hormone), इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही चार संप्रेरके ऋतुचक्र नियंत्रित करतात.
- पुटीका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटीकांपैकी एका पुटीकेसह त्यातील अंडपेशीचा (डिंबपेशीचा /Oocyte) विकास होण्यास सुरुवात होते.
- विकसनशील पुटिका ‘इस्ट्रोजेन’ संप्रेरक स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निमिती होते.
- LH: पितपिंडकारी संप्रेरकाच्या (Luteinizing hormone) प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यांतील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडण्याला अंडमोचन (Ovulation) म्हणतात.
- अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड (Corpus luteum) तयार होते. हे पितपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते व असे अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते.
- अंडपेशीचे फलन 24 तासात झाले नाही तर पितपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात (Corpus albicans) होते.
- अंडपेशीचे फलन झाले नाही तर इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणे पूर्णपणे थांबते. या संप्रेरकांच्या अभावामुळे
- गर्भाशयाचा अंतःस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतःस्तरातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. अफलित अंडपेशी बाहेर टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव साधारणतः पाच दिवस सुरु राहतो. यालाच ऋतुस्राव / मासिक पाळी असे संबोधतात.
- या प्रक्रियेत जोपर्यंत अंडपेशीचे फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे रोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात पुनरावृत्ती होत राहते. भ्रूणाचे रोपण झाल्यास अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. 4-5 दिवसांचा रजःस्रावाच्या कालावधी
- मध्ये स्त्रीला वेदना होत असतात. तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने अशक्तपणा जाणवतो.
- मासिक काळामध्ये स्त्रीला संसर्गाचीही शक्यता असते. मासिक पाळीत विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच विश्रांतीची गरज असते.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
Menstrual Cycle
- Definition: Female reproductive system undergoes something series of changes at puberty and those changes repeat at the interval of every 28 – 30 days. These repetitive changes prepare for pregnancy are called as menstrual cycle.
- Menstrual cycle is a natural process, controlled by four hormones.
- Hormones: Four hormones are follicle stimulating hormone (FSH), luteinizing hormone (LH), estrogen and progesterone. FSH: One of the several follicles in the ovary starts to develop along with the oocyte present in ovary, under the effect of follicle stimulating hormone. This developing follicle secretes estrogen.
- Effect of estrogen: Endometrium of the uterus starts to develop or regenerate under the effect of estrogen.
- Ovulation: Follicle bursts under the effect of luteinizing hormone and oocyte is released is called as ovulation. Remaining tissue of the burst follicle forms the corpus luteum. Corpus luteum starts to secrete progesterone. Endometrial glands secrete their secretion under the effect of progesterone. Such endometrium is ready for implantation of embryo.
- If oocyte is not fertilized within 24 hours, corpus luteum becomes inactive and transforms into corpus albicans. Due to this, secretion of estrogen and progesterone stops completely.
- Endometrium starts to degenerate in absence of estrogen and progesterone hormones.
- Bleeding: Tissues of degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out through vagina. This is accompanied with continuous bleeding. Bleeding continues approximately for five days. This is called as menstruation.
- Unless the oocyte is fertilized and embryo is implanted, menstruation is repeated every month.
- If the embryo is implanted, repetition of menstruation cycle is temporarily stopped till the parturition and there after period of breast feeding.
- The women experience severe pains during menstruation.
- Severe weakness is felt due to heavy bleeding. There is higher possibility of infections too during overall menstruation period.
- Due to all above reasons, there is need of rest along with special personal hygiene.
*⋐⋑🔸 ⚜️🔸⋐⋑*
ऋतुचक्रावर आधारित काही प्रश्न.
- आर्तवचक्रात रजोस्त्रवाचा काळ कधी असतो?
2. अंडमोचन साधारण आर्तवचक्रात कोणत्या दिवशी होते?
उत्तर: अंडमोचन साधारण आर्तवचक्रात 14 व्या किंवा पंधराव्या दिवशी होते.
3. आर्तवचक्राच्या कोणत्या काळात पितपिंड सक्रिय असते? ते कोणती संप्रेरके तयार करते?
उत्तर:
पीतपिंड अंडमोचन झाल्यानंतर ते 28 व्या दिवसापर्यंत सक्रिय असते.
सक्रिय असताना पितपिंड प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन ही संप्रेरके तयार करते.
सक्रिय असताना पितपिंड प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन ही संप्रेरके तयार करते.
4. आर्तवचक्रात स्त्रीचे कोणते अवयव बदलत राहतात?
उत्तर: अंडाशय आणि गर्भाशय हे स्त्रीचे दोन अवयव आर्तवचक्रा सतत बदलत राहतात.
5. आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तराच्या पुनर्निर्मितीचा काळ कोणता?
उत्तर: आर्तवचक्रात 5 ते 14 दिवस हा गर्भाशयाच्या अंत:स्तराच्या पुनर्निर्मितीचा काळ असतो.
6. आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत: स्तरातील ग्रंथी स्त्रावण्याचा काळ कोणता?
उत्तर: आर्तवचक्रात 15 ते 28 दिवस हा गर्भाशयाच्या अंत: स्तरातील ग्रंथी स्त्रावण्याचा काळ आहे.
*❀꧁★꧂❀*
Some questions on menstrual cycle.
1. What is the period of menstruation?
Ans: 1 to 5 days is the period of menstruation.
On which day does ovulation offer during menstrual cycle?
Ans: ovulation occurs on 14th or 15th day.
2. On what day does ovulation normally occur in the menstrual cycle?
Ans:- Ovulation usually occurs on the 14th or 15th day of the menstrual cycle.
2. During which period is Corpus luteum active during menstrual cycle? Which hormones are secreted by Corpus luteum?
Ans: Corpus luteum is active till the 28th day of menstrual cycle.
Corpus luteum secrets estrogen and progesterone.
3. In menstrual cycle which reproductive organs undergo changes?
Ans: Ovary and uterus these reproductive organs undergo changes during menstrual cycle.
4. Which period is said to be period of regeneration of endometrium?
Ans: In menstrual cycle day 5 to 14 are period of regeneration of endometrium.
5. Which period is said to be period of secretions of glands in endometrium?
Ans: Period of secretion of glands in endometrium is 15 th to 28 th day.
*╰✺༺☬༒☬༻✺╯*
सुमधुर स्नेह वंदन।🙏
गाड़ी में अगर ब्रेक नहीं तो दूर्घटना निश्चित है
जीवन में संस्कार और मर्यादा
नहीं है तो मनुष्य का पतन निश्चित है।
आपका हर दिन मंगलमय और
सुखमय हो।🎷
━━━━✧❂✧━━━━
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा