10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 3.
10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2.3.
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला 🔗 स्पर्श करा👇
आज प्रथम काही व्याख्या पाहू किंवा त्या शब्दांचे अर्थ पाहू.
धातू-अधातू या धड्यानंतर याच धड्यात खूप जास्त व्याख्यांचा समावेश आहे.
Today let's first look at some definitions or meanings of those words.
After the chapter on Metals and Nonmetals, this chapter contains a lot more definitions.
1. कलिकायन
किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीनेअलैंगिक प्रजनन होते.
* Budding in yeast
A small bulge or bud appear on the surface of unicellular yeast is called budding. It is asexual reproduction.
2. खंडीभवन
बहुपेशीय जनक सजीवांच्या शरीराचे असंख्य तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागण्याच्या क्रियेला खंडीभवन असे म्हणतात. खंडीभवन ही अलैंगिक प्रजनन पद्धत आहे.
* Fragmentation
Fragmentation is the asexual type of reproduction in which the body of multicellular parent organism bricks up into many fragments. Each fragment can start leaving independently
3. पुनर्जनन
प्लानेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करून प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी निर्माण करण्याच्या पद्धतीला पुनर्जनन म्हणतात.
* Regeneration
Regeneration is the asexual reproduction under favourable conditions, certain situations, in planaria in which the body is broken into two parts and resulting each part regenerates remaining part of the body.
4. मुकुलायन (Budding)
हायड्राच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने मुकुल म्हणजेच फुगवटा तयार होतो, त्याच्या वाढीनंतर त्याचे रूपांतर नवजात सजीवात करणे या क्रियेला मुकुलायन म्हणतात.
* Buddy in hydra
Budding in hydra is asexual reproductive process in which an outgrowth is form by repeated divisions of regenerative cells of body wall called Bud.
5. शासकीय प्रजनन (Vegetative propagation)
वनस्पतींमध्ये मूळ (गाजर), खोड (बटाटा), पान (पानफुटी), मुकुल (ऊस )यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन
म्हणतात.
* Vegetative propagation
Vegetative propagation is a type of asexual reproduction in plants that takes place with the help of vegetative parts like root (Carrot), stem(potato), leaf (Bryophyllum)and bud (sugarcane).
6. फलन
नर जनकाचे पुंयुग्मक व मादी जनकाचे स्त्रीयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. याला फलन (fertilization) म्हणतात.
* Fertilization
The process by which diploid zygote is formed by union of haploid male and
female gametes.
7. पुष्पवृंत्त
गुलाब, जास्वंद अशा बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला ‘पुष्पवृंत’ (Pedicel) म्हणतात आणि अशा फुलांना पुष्पवृंती फुले म्हणतात.
* pedicel
Many flowers such as Rose, hibiscus have the stalk for support, called as pedicel.
8.स्थानबद्ध
गहू, तांदूळ या वनस्पतींच्या फुलांना किंवा देठच नसणाऱ्या फुलांना ‘स्थानबद्ध’ (Sessile) फुले म्हणतात.
* Sessile
Flowers of wheat, rice are without stalk is called as ‘sessile’.
9. स्वपरागण
जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलांत होते तेव्हा त्यास स्वयंपरागण म्हणतात.
* Self-pollination
When pollination involves only one flower or two flowers borne on same plant, it is called as self-pollination.
10. परागण किंवा परागीभवन
फुलांच्या परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होण्याच्या क्रियेला परागण किंवा परागीभवन म्हणतात.
* Pollination
Transfer of pollen grains from anther to the stigma is called pollination.
11. परपरागण
जेव्हा परागण क्रिया एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीमधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण म्हणतात.
* Cross pollination
When pollination involves two flowers borne on two plants of same species, it is called cross-pollination.
12. भ्रूणपोष
फलनाच्या क्रियेत अंकुरलेल्या परागकणातून बाहेर येणारे दुसरे पुयुग्म दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावल्यानंतर तयार होणाऱ्या पोषकद्रव्याला जो वनस्पतीच्या विकासासाठी अन्न साठवतो त्यास भ्रूणपोष म्हणतात.
* Endosperm
endosperm is the part of a seed that stores food for the development of a plant substance formed by the union of second male game with two polar nuclear at the time of fertilization in plants.
13. रजोनिवृत्ती
स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वयपरत्वे (40-50 वर्षे) आणि संप्रेरकांच्या कमी प्रमाणामुळे थांबण्याला रजोनीवृत्ती म्हणतात.
* Menopause
Stoppage of functioning of female reproductive system due to advancing age (40-50 years) and due to lack of synthesis of hormones is called menopause.
14. अपरा
मातेच्या गर्भाशयात भृणाच्या वाढीसाठी अन्नपुरवठा करणारा जो अवयव असतो त्यास अपरा असे म्हणतात.
* Placenta
An organ developed in the uterus of the pregnant mother, through which the embryo is given nourishment is called placenta.
15. आर्तवचक्र / ऋतुचक्र (Menstrual cycle)
यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही नैसर्गिक बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28-30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तवचक्र/ऋतुचक्र म्हणतात.
* Menstrual cycle
Female reproductive system undergoes some natural changes at puberty and those changes repeat at the interval of every 28 – 30 days. These repetitive changes are called as menstrual cycle.
16. पीतपिंड [Corpus luteum (yellow body)]
अंड मोचन क्रियेनंतर अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटीकेपासुन जे संप्रेरक स्त्राव निर्माण करणारे पिवळसर रंगाचे पिंड तयार होते त्यास पीतपिंड असे म्हणतात. हे पीतपिंड पेशींचा समूह असून प्रोजेस्टेरोन हार्मोन/ संप्रेरक तयार करते, यातून गर्भधारणा टिकून राहते.
* Corpus luteum (yellow body)
Corpus luteum is the temporary secondary structure that is formed from empty ovarian follicle after ovulation. This corpus luteum produces progesterone and thereby maintains pregnancy.
17. श्वेतपिंड
स्त्रीच्या शरीरात अंडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही तर पितपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर ज्या पिंडात होते त्यास श्वेतपिंड असे म्हणतात.
* Corpus albicans /white body
If the ovum is not fertilized within 24 hours, then the fibrous scar degenerate body is formed from Corpus luteum is called Corpus albicans.
18. अंडमोचन
प्रजनन क्रियेत संप्रेरकाच्या प्रभावाने पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडण्याच्या क्रियेला अंडमोचन असे म्हणतात.
* Ovulation
In reproduction bursting of mature ovarian follicle under the influence of hormones to release the oocyte is called ovulation.
19. IVF
टेस्ट ट्युब बेबी कार्यप्रणाली ही 2- 3 आठवड्यांची असून यात काचनलिकेमध्ये फलन घडवून आणि त्यानंतर तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दांपत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करून वाढवणे या तंत्राला IVF म्हणजेच in vitro fertilization किंवा काच नलिकेतील फलन असे म्हणतात.
* IVF In vitro fertilization
The 2- 3 weeks technique in which fertilization is brought about outside the female body in the test tube and the embryo is implanted in uterus of woman is called in vitro fertilization.
20. वीर्यपेढी
इच्छुक पुरुषांच्या सर्वंकष शारीरिक आणि इतर तपासण्यांनंतर त्यांनी स्खलित केलेलं वीर्य 0° C तापमानाखाली निर्जंतुक स्थितीत साठवून ठेवण्याची पेढी म्हणजे वीर्यपेढी.
* sperm bank
Semen ejaculated by the desired men is collected after their thorough physica
l and medical check-up and stored in sub zero temperature in sterile conditions is called sperm bank .
*“पावलागणिक स्वत:च्या
ज्ञानात
भर टाकित जाणे
यापेक्षा अधिक सुख
दुसरे काय असू शकते.”*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
अति क्षय सुंदर असे मार्गदर्शन केले आहे
उत्तर द्याहटवा