10th, Sci.II, Animal classification. 10 वी, विज्ञान II, प्राण्यांचे वर्गीकरण 3.
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇
प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती आपण पाहिली. त्याचा थोडा आढावा घेऊ. कारण पुढे प्राण्यांचा अभ्यास करत असताना या मुद्द्यांचा वारंवार उल्लेख होणार आहे. हे मुद्दे त्यावेळेस स्पष्टीकरणाशिवाय असणार आहे. त्यामुळे ते आत्ताच समजून घेतले तर पुढे सोपे जाईल.
एकपेशीय सजीवांचे शरीर हे केवळ एकाच पेशीपासून तयार झाल्याने सर्व कार्ये त्याच पेशीच्या साह्याने चालतात.
एकपेशीय सजीवांमध्ये शरीराचे संघटन ‘जीवद्रव्य-स्तर’ (Protoplasmic grade) या प्रकारचे असते.
शारीरिक सममिती (Body Symmetry): प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार आहेत. एका काल्पनिक अक्षातून प्राणी शरीराचा छेद घेतला असता त्याचे समान दोन भाग होतात की नाही यावर प्राणी शरीरांचे तीन प्रकार पडतात.
- असममित शरीर (Asymmetrical body) : काही प्राण्यात असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर दोन समान भागांत विभागले जाऊ शकते. उदा. स्पंज अमिबा, पॅरामेशीयअम.
- अरिय सममिती (Radial Symmetry): या प्राण्यांच्या शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून (Plane) छेद घेतल्यास दोन समान भाग पडतात. उदा. तारामासा.
- द्विपार्श्व सममिती (Bilateral symmetry) : या प्राण्यांच्या शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास शरीराचे दोन समान भाग होतात. उदा. शेळी 🐑, उंदीर 🐁,कीटक, मासे🐟, बेडूक 🐸, गाय🐄 ,पक्षी🐦, मानव😎, कासव🐢 इत्यादी.
We have seen new methods of classification of animals. Let's take a look at it. Because these points will be mentioned again and again while studying animal classification.These points are going to be unexplained at that time. So understanding it now will make it easier later.
Since the body of a unicellular organism is formed from only one cell, all functions are carried out by the same cell.
Protoplasmic grade organization: The body organization of unicellular animals is referred to as the protoplasmic grade organization.
Protoplasmic grade organization: The body organization of unicellular animals is referred to as the protoplasmic grade organization.
Body Symmetry : There are different types of animal bodies.
If the body of any animal is cut through an imaginary axis it may or may not produce two halves, depending on this property three types of body symmetry are present,
- Asymmetrical Body: There is no such imaginary axis of the body through which we can get two halves then it is called an Asymmetrical body. Ex. Paramecium, amoeba, sponges.
- Radial symmetry: if an imaginary cut passes through the central axis but any plane of the body, it gives two halves then such an animal is called a radial symmetry body. Ex. Starfish.
- Bilateral symmetry: there is only one such imaginary axis of the body through which we can get two halves then it is called bilateral symmetry body. Ex. Man 😎 fish 🐟 sheep 🐑 dogs, frog 🐸 🐕 rat 🐁 cows, birds, insects.
द्विस्तरीय प्राणी: सर्व निडारिया / सिलेंटरेटा प्राण्यांमध्ये फक्त दोनच आद्यस्तर, बहिर्जनस्तर (Ectoderm) आणि अंतर्जनस्तर (Endoderm)] तयार होतात अशा प्राण्यांना द्विस्तरीय प्राणी म्हणतात.
त्रिस्तरीय प्राणी: बहुतांश सर्व प्राण्यांमध्ये तीन आद्यस्तर बहिर्जनस्तर (Ectoderm) सोबत मध्यस्तर (Mesoderm) आणि अंतर्जनस्तर (Endoderm)] तयार होतात अशा प्राण्यांना त्रिस्तरीय प्राणी म्हणतात.
Germ Layers: Diploblastic and triploblastic
Diploblastic animals: All cnidarians consist of two germ layers endoderm and ectoderm these animals are called as diploblastic animals.
Triploblastic animals: In most animals, (except cnidarians) three germ layers are formed endoderm, mesoderm, and ectoderm these animal are called as triploblastic animals.
🎷
देहगुहा (Body Cavity/Coelom)
व्याख्या: शरीरभित्तिका आणि आतील अवयव यांच्या दरम्यान असलेल्या
पोकळीस देहगुहा म्हणतात.
भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात बहुपेशीय प्राण्यांच्या मध्यस्तरापासून (Mesoderm) किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होते.
सत्य देहगुहा असणारे प्राणी
(Eucoelomate): या प्रकारची देहगुहा
वलयी प्राणी संघ व त्यानंतरच्या सर्व संघांतील प्राण्यांच्या शरीरात असते.
देहगुहा नसणारे प्राणी : रंध्रीय प्राणी, निडारिया (सिलेंटरेटा संघ) चपट्या कृमींचा संघ या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा
नसते,अशा प्राण्यांना देहगुहाहीन (Acoelomate) प्राणी म्हणतात.
खोटी / फसवी देहगुहा असणारे प्राणी (Pseudocoelomate): काही प्राण्यांच्या शरीरात देहगुहा असते पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने तयार झालेली नसते. अशा प्राण्यांना खोटी / फसवी देहगुहा असणारे प्राणी असे म्हणतात . उदा.गोल कृमीं
Body cavity (Coelom)
Definition: The cavity present between the body wall and the internal organs is called as body cavity/coelom.
Eucoelomate: Animals with true body cavities. If the body cavity is formed from either mesoderm or gut at the time of embryonic development then the true body cavity is formed such animals are called Eucoelomate. ex. Animals of phylum Annelida and all phyla coming after Annelida.
Acoelomate: If the body cavity is absent in the case of some animals, Such animals are called acoelomate. Ex. phyla Porifera, Cnidaria, and Platyhelminthes.
Pseudocoelomates: if the body cavity is not formed by the above-mentioned two ways then such body cavity is called a Pseudocoelomate. Ex. Aschelminthes.
खंडीभवन (Body Segmentation):
व्याख्या: काही प्राण्याचे शरीर छोट्या-छोट्या, समान भागांत विभागलेले असेल तर अशा शरीराला खंडीभवित शरीर (Segmented body) म्हणतात. यातील प्रत्येक छोट्या
भागाला खंड (Segment) म्हणतात. उदा. वलयी प्राणीसंघ, गांडूळ.
Body Segmentation:
If the body of the animal is divided into small, similar units, then such a body is called a segmented body.
Each small unit is called a segment. Ex. earthworms,
phylum Annelida.
*प्रामाणिकपणा, अपेक्षा न ठेवता केलेले कर्म, सत्य वचन आणि मधुर वाणी हे दुसऱ्याला दिलेले वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम आहे.*
*जो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य खुलवत असतो...!!!*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा