मुख्य सामग्रीवर वगळा

10 वी, भाग II, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान 2, 10th, part II, Cell Biology and Biotechnology 2




10 वी, भाग II, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान 2, 10th, part II, Cell Biology and Biotechnology 2



मानवाने मानवासाठी काहीतरी हातभार लावलाच पाहिजे. आज आपण एका विषयावर येणार आहोत जो भविष्यकाळासाठी काळाची गरज ठरणार आहे. तो विषय म्हणजे अवयव -दान व देहदान.


We must contribute something for humans. Today, we are going to discuss a topic that will become crucial for the future – organ donation and body donation.

🎷 स्रोताच्या आधारावर मूलपेशींचे दोन प्रमुख प्रकार कोणते?
उत्तर: स्रोताच्या आधारावर मूलपेशींचे दोन प्रमुख प्रकार
भ्रूणीय मूलपेशी (Embryonic stem cells)
वयस्क/ प्रौढ मूलपेशी (Adult stem cells)

🥁Which are the two types of stem cells depending upon the source?
Ans: Depending upon the source, the two types of stem cells are as follows
Embryonic stem cells
Adult stem cells.


🥁 मुल पेशींचे जतन कसे केले जाते?
उत्तर:
  • मुल पेशींच्या जतन क्रियेसाठी द्रवरूप नायट्रोजन चा वापर केला जातो.
  •  मूलपेशींचे जतन करण्याकरीता नाळेतील रक्त, रक्त-अस्थिमज्जा अथवा कोरकपुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतूविरहीत अशा छोट्या छोट्या कुप्यांमध्ये ठेवले जाते. 
  • ह्या कुप्या -135 0 C पासून -190 0 C इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवून त्यांचे सुरक्षित जतन केले जाते.

🎷 How stem cells preserved?
Ans: 
  • liquid nitrogen is used for the purpose of preservation of stem cells. 
  • Stem cell samples are carefully collected from sources like cord blood, red bone marrow or embryo (blastocyst) and are kept in small, sterile vials.
  • Those vials are kept in liquid nitrogen at -135° C to -190° C.

भ्रूणीय मूलपेशी (Embryonic stem cells)
उत्तर:
  •  फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व फलित अंड्याचे रूपांतर भ्रूणात होते.या भ्रूणपेशींचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होते. याच भ्रूणपेशींना मूलपेशी असे म्हणतात.
  •  गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृतपेशी, चेतापेशी इ. निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. या सर्व पेशी एकाच मूल पेशीपासून तयार होतात.
  • आश्चर्य म्हणजे मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीं पासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशींपासून जन्म घेतात.
  • मूल पेशी या अविभेदित, प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. म्हणजेच मूलपेशी सर्व मानवी पेशींच्या पालकपेशी असतात.
  • 14 व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजे 5 ते 7 व्या दिवशी जर या मूल पेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवले व त्यांना विशिष्ट
  • जैवरासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशींमध्ये, त्यापासून ऊतींमध्ये व नंतर त्या अवयवांमध्ये होऊ शकते असे दिसून आले आहे.
  • फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व त्याचे रूपांतर भ्रूणात होते. या भ्रूणपेशींचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होते व असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या पेशींना मूलपेशी असे म्हणतात. म्हणजेच मूलपेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला ‘बहुविधता’ (Pluripotency) असे म्हणतात.

🎺 Embryonic stem cells
Ans:
  • Embryonic cells before differentiation are called as embryonic stem cells. 
  • Division of the zygote starts and thereby it is converted into embryo.
  • 220 different types of cells in human body are formed from single type cells i.e. embryonic stem cells.
  • Thus, stem cells are primary type of undifferentiated cells with self-multiplying ability and they are parent cells of all types of human cells. This property of stem cells is called as pleuripotency.
  • It has been found that if these stem cells are collected well before the beginning of differentiation on 14th day i.e. during 5th – 7th day and cultured with certain biochemical stimulus in laboratory, as per the stimulus, they can transform themselves into desired type of cells, thereby tissues and finally into organs.

🎺 अवयवदान व देहदान
  • विज्ञानाच्या प्रगतीतून आपणास जेव्हा लक्षात आले की मृत्यूनंतरही शरीरातील काही अवयव चांगल्या स्थितीत असू शकतात, तेव्हा त्या अवयवांचा गरजवंत रुग्णास वापर केला असता त्यांचे आरोग्य चांगले होते हे लक्षात आले.
  • देहदान आणि अवयव दान या संकल्पनेतून आपण गरजवंत रुग्णास चांगले आयुष्य देऊ शकतोत.
  • एखाद्याला उत्तम आरोग्य मिळावे किंवा एखाद्यास जीवदान मिळावे यासाठी अवयवदान योग्य ठरते.
  • त्वचा, डोळे, हाडे, फुप्फुसे, स्वादुपिंड, यकृत, वृक, हृदय, हृदयाच्या झडपा इत्यादी अवयवांचे दान करता येते.
फायदे
  • अवयव दानातून व्यक्तींचे प्राण वाचवता येतात.
  • अंध व्यक्तीस दृष्टी मिळू शकते.
  • देहदानातून वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते.

 🎷 Organ and body donation

  • If the organs of deceased / Dead, Late are in good condition and functional than organs can be used for donation.
  • Due to progress in science it is possible to donate organs.
  • Someone can lead a better and healthy life after receiving the donated organ.
  • Skin, pancreas, bone 🦴, lungs 🫁 eye 👁️, liver, kidney, heart 💖, heart valves etc can be donated.
Benefits
  • Blind persons can get the vision by eye donation.
  • Organ donations can save the life of other needy patients.
  • The critical patients life can be saved by organ donation.
  • By body donation, body can be made available for research in medical studies.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.