मुख्य सामग्रीवर वगळा

Top 10, 10th Class, part I,अवकाश मोहिम

  •  Top 10, 10th Class part I, अवकाश मोहिम

   * अच्छी सुरत हो तो, अच्छी बात है

*अच्छी सुरत से ज्यादा मायने अच्छा स्वभाव रखता है !*
*सुरत तो उम्र के अनुसार बदल जायेगी ,*
*पर अच्छा स्वभाव आपका जीवनभर साथ देगा..*
🎷 कृत्रिम उपग्रहाचे प्रकार

उपग्रहांच्या कार्यानुसार त्यांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.

  • हवामान उपग्रह - हवामानाचा अंदाज व अभ्यास करण्यासाठी.
  • दळणवळण उपग्रह - जागतिक संपर्क व दूरसंचार 
  • ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह - दूरचित्रवाणी कार्यक्रमासाठी.
  • दिशादर्शक उपग्रह - पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची स्थान निश्चिती व भूजल वायू वाहतुकीचे नियंत्रण व सुसंचालन यासाठी.
  • सैनिकी उपग्रह - लष्करी संरक्षण दृष्टिकोनातून पृथ्वीवरील ठिकाणांची माहिती मिळवणे सीमारेषांचे निरीक्षण करणे यासाठी.
  • पृथ्वी निरीक्षक उपग्रह - संपूर्ण पृथ्वीचे नियमितपणे सर्वांग निरीक्षण व माहिती संकलन करण्यासाठी.

🥁 कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमण कक्षा.

  • व्याख्या:- उपग्रहांचा ग्रहाभवती फिरण्याचा/ परिक्रमा करण्याचा मार्ग म्हणजे भ्रमण कक्षा.
  • उपग्रहांच्या कार्यावरून त्यांची भ्रमण कक्षा ठरते.
  • कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा म्हणजे उपग्रहाचा पृथ्वीभोवती भ्रमण/परिक्रमा (फिरणे) करण्याचा मार्ग होय.
  • उपग्रहांची भ्रमण कक्षाही वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असू शकते. उपग्रहांची भ्रमण कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्ताला समांतर किंवा कोन करणारी असू शकते.
  • उपग्रहांच्या पृष्ठभागापासूनच्या उंचीनुसार त्यांच्या कक्षेचे तीन प्रकार पडतात.

A. उच्च भ्रमण कक्षेचे उपग्रह (HEO- High Earth orbit)

B.मध्यम भ्रमण कक्षेचे उपग्रह (MEO - medium Earth orbit)

C.निम्न भ्रमण कक्षेचे उपग्रह ( LEO-  low earth orbit)


🎷 उच्च भ्रमण कक्षेचे उपग्रह (HEO- High Earth orbit)

  • व्याख्या:- पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35780 किलोमीटर किंवा अधिक उंचीवरील कृत्रिम उपग्रहांना उच्च भ्रमणकक्षेचे उपग्रह म्हणतात.
  • उच्च भ्रमण कक्षेच्या उपग्रहांना भूस्थिर उपग्रह  (Geosynchronous satellite) म्हणतात.कारण उपग्रहांची पृथ्वीभोवती परिभ्रमणाची दिशा व पृथ्वीची परिवलनाची दिशा एकच असते त्याच सोबत उपग्रहाचा पृथ्वीभोवतीचा परिभ्रमण कालावधी व पृथ्वीचा परिवलन कालावधी एकच असतो.  अशा उपग्रहांची पृथ्वी सापेक्ष स्थिती ही स्थिर असल्याचा भास होतो
  • उपयोग:-उच्च कक्षा उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात हवामानशास्त्र, दूरसंदेशवहन, दूरचित्रवाणी, आकाशवाणीचे प्रसारण यासाठी उच्च भ्रमण कक्षेचे उपग्रह वापरले जातात.

 

🥁 मध्यम भ्रमण कक्षेचे उपग्रह

 व्याख्या:-भूपृष्ठापासून 2000 km ते 35780 km यांची दरम्यान असलेल्या कृत्रिम उपग्रहांना मध्यम भ्रमण कक्षेचे उपग्रह म्हणतात.

कक्षा:- या उपग्रहांची कक्षा लंबवर्तुळाकार असते आणि हे उपग्रह उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेशावरून मार्गक्रमण करतात. या कक्षांना 'ध्रुवीय कक्षा' असे म्हणतात. हे उपग्रह 2 ते 24 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतात.

उपयोग:-  ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासास उपयुक्त. दिशा-दर्शक उपग्रह या कक्षामध्ये भ्रमण करतात.


🎻 निम्न भ्रमण कक्षेचे उपग्रह

  • व्याख्या:- भूपृष्ठ पासून 180 km ते 2000 km या उंची दरम्यान असलेल्या कृत्रिम उपग्रहांना निम्न भ्रमण कक्षेचे उपग्रह म्हणतात.
  • कक्षांच्या उंचीनुसार जवळपास 90 मिनिटात यांचे एक परिभ्रमण पूर्ण होते. आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक(International Space Station) , हबल दुर्बीण हे याच कक्षामध्ये परिभ्रमण करतात.
  • उपयोग:- शास्त्रीय प्रयोगासाठी अथवा हवामान अभ्यासासाठी.

🎸 Swayam स्वयम
पुण्यातील COEP, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह तयार करून इस्त्रोच्या मार्फत 2016 साली अवकाशात पाठवला. या उपग्रहाचे नाव स्वयम असे ठेवण्यात आले.
वजन:- सुमारे 1kg .
अंतर:- तो पृथ्वीपासून 515 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करत आहे.
कार्य:- पृथ्वीवरील एका स्थानावरून दुसऱ्या स्थानापर्यंत एका विशिष्ट पद्धतीने संदेश पाठवणे.

* उपग्रह प्रक्षेपक
 उपग्रह प्रक्षेपक हे फार खर्चिक असतात, कारण ते फक्त एकदाच वापरता येतात. यावर मात करण्यासाठी अमेरिकेने Space Shuttle तयार केले आहे. यात फक्त इंधनाची टाकी वाया जाते व बाकी सर्व भाग पृथ्वीवर परत येतात. हे पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकते.

* एखाद्या अंतराळयानाला चंद्रापर्यंत पोहोचण्यास लागलेला सगळ्यात कमी वेळ 8 तास 36 मिनिटे इतका आहे.

🎇 ही माहिती आपणास असावीच
🎸 कल्पना चावला
पंजाब मधून एरोनॉटिक्स ची अभियांत्रिकी पदवी प्राप्त.
अंतराळ संशोधन मोहिमेदरम्यान 336 तास अंतराळात.


🥁सुनीता विल्यम्स
2006 मध्ये डिस्कवरी मधून प्रथम अंतराळात.
International Space station येथे प्रवास व 29 तास शटल बाहेर काम.
192 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम.

* भारतातील अग्निबान प्रक्षेपण केंद्र
1. थुंबा, तिरूवनंतपुरम
2. श्रीहरीकोटा
3. चांदीपूर (ओडिशा)

* भारतातील अवकाश संशोधन संस्था.
1. विक्रम साराभाई अवकाश केंद्र, तिरूवनंतपुरम.
2. सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र, श्रीहरीकोटा.
3. स्पेस ॲप्लीकेशन सेंटर, अहमदाबाद.

* विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते. 
त्यांच्या प्रयत्नातूनच भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात सोडला होता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) स्थापनेत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.

🥁 अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन
कार्यशील नसलेले उपग्रह, प्रक्षेपणाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपकांचे भाग व एखादा उपग्रह दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूवर आढळल्यामुळे निर्माण होणारे तुकडे अशा सर्व वस्तू चा समावेश अवकाशातील कचऱ्यात होतो.
अंदाजे 1 सेमी होऊन जास्त लांबीचे निरुपयोगी वस्तूंचे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत.
अपाय:- हा कचरा कृत्रिम उपग्रहांसाठी धोकादायक ठरू शकतो.
भविष्यात अवकाशातील केरकचरा व्यवस्थापन हा एक व्यवसाय ठरू शकतो.

* कृत्रिम उपग्रहाचे कार्य हा घटक कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा ठरवतो.

* भारताचा उपग्रह प्रक्षेपक PSLV (Polar Satellite Launch Vehicle) आहे.

* चंद्रावर पाणी असल्याचा शोध सर्वप्रथम भारतीय अवकाश यान चंद्रयान 1 ने लावला.

*.  सर्व कृत्रिम उपग्रह सौर ऊर्जेवर चालतात.

* जगात सर्वप्रथम चंद्र मोहीम रशिया या देशाने राबवली.


* कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमण कक्षेचे तीन प्रकारे वर्गीकरण करता येते. उपग्रहांच्या विविध कक्षा खालील आकृतीत पाहू.



* 'इस्रो' ने बनवलेल्या PSLV या प्रक्षेपकाचा बाह्य आराखडा.

* दिवाळीच्या दिवसात उडवले जाणारे रॉकेट हे एक प्रकारचे प्रक्षेपकच आहे. या रॉकेट मधील इंधन त्याला जोडलेल्या वातीच्या साह्याने पेटवली की रॉकेट  प्रक्षेपकाप्रमाणे वर झेपावते. ही क्रिया देखील न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे.


शास्त्रज्ञांच्या मते एका अंदाजानुसार काही वर्षात पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांची संख्या दहा लाखापर्यंत पोहोचेल. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 9 हजाराहून अधिक उपग्रह स्थापित करण्यात आले आहेत त्यापैकी पाच हजाराहून अधिक स्टार लिंग चे आहेत हे एक प्रकारचे तारा मंडळ आहे जे पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात इंटरनेट सेवा स्थापित करण्यासाठी स्पेस एक्स तयार करत आहे हे पूर्ण करण्यासाठी हजारो उपग्रह पाठवायचे आहेत. सौजन्य 🙏 12 जानेवारी 2024 दिव्य मराठी आवृत्ती छत्रपती संभाजीनगर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.