मुख्य सामग्रीवर वगळा

8 वी विज्ञान, 6.2 द्रव्याचे संघटन नोट्स.

 

8 वी विज्ञान, 6.2 द्रव्याचे संघटन नोट्स.

┅━━━━━•❀•━━━━━┅


      ═❖°•✺•°❖═

नवीन विज्ञान ज्ञानपिपासूंनी खालील लिंकला स्पर्श करून ग्रुप जॉईन करावा 👏🤩

    माहिती विज्ञानाची 🎷

        ╭✺༺☬༒☬༻✺╮

🎺 मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश्य या तीन प्रकारांत केले जाते.

     ━━━━•❀•━━━━

🎯 संयुगांचे तीन प्रकार कोणते? उदाहरणासह सांगा. 

संयुगांचे तीन प्रकार

1. सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे. - उदा. पेट्रोल, कर्बोदके, प्रथिने, स्वयंपाकाचा गॅस. 

2. असेंद्रिय संयुगे किंवा अ कार्बनी संयुगे.- उदाहरणार्थ मीठ, सोडा, लोखंडाचा गंज,  कोपर सल्फेट म्हणजेच मोरचूद,चुनखडी.

3.  जटील संयुगे-  हिमोग्लोबिन,क्लोरोफिल,  सायनोकोबालमिन म्हणजेच जीवनसत्व बी- 12,

    ━━═◆❃★❂★❃◆═━━

🏄 प्रावस्था: एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था (phase) म्हणतात.

🏈 समांगी मिश्रणजेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला समांगी मिश्रण म्हणतात. 

🎺 विषमांगी मिश्रणजेव्हा मिश्रणातील घटक दोन किंवा अधिक प्रावस्थांमध्येविभागलेले असतात तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण म्हणतात.

     °══✺══°

🎯 हे नेहमी लक्षात ठेवा.

  1. का स्थायूचे एकत्रित असलेले किंवा एका पात्रात असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था होते. उदा., दगडांचा ढीग. 
  2. द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेले सर्व द्रावणीय पदार्थ मिळून एकच प्रावस्था होते उदा., समूद्राचे पाणी
  3. एका द्रवाच्या किंवा एकत्रित किंवा एका पात्रात असलेल्या सर्व थेंबाची मिळून एकच प्रावस्था होते. उदा., पावसाचे थेंब.
  4. एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या; परंतु एकमेकांत न मिसळलेल्या द्रवांच्या प्रावस्था स्वतंत्र असतात. उदा., तेल व पाणी
  5. एकत्रित असलेल्या सर्व वायुरूप पदार्थांची मिळून एकच प्रावस्था होते उदा., हवा.

✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤

🎤 द्रावण (Solution) : दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. उदा. मिठाचे पाण्यातील द्रावण

🏉 द्रावकद्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात.

🎠 द्राव्यद्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटक पदार्थांना द्राव्य म्हणतात.

🎾 विरघळणेद्राव्य द्रावकात मिसळून द्रावण बनण्याची क्रिया म्हणजे विरघळणे.

   【❖• ✺ •❖】


🎡 द्रावणांचे प्रकार

  1. द्रवामध्येस्थायूउदा. समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूद, पाण्यात विरघळलेले मीठ, साखरेचा पाक.
  2. द्रवामध्ये द्रव: उदा. व्हिनेगार, विरल सल्फ्रयुिक आम्ल.
  3. वायमूध्ये वायू: उदा. हवा.
  4. स्थायमूध्ये स्थायू: उदा. पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील. 
  5. द्रवामध्ये वायू: उदा. क्लोरीनयुक्त पाणी, हायड्रोक्लोरिक आम्ल, सोडा वॉटर.

🏊समांगी मिश्रणाचे म्हणजेच द्रावणाचे संघटन संपूर्ण राशीभर एकसारखे असते.

       ═ ❖• ✺ •❖ ═

🏀निलंबन (Suspension): 

द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन म्हणतात. 

उदा. पाणी व भुसा ह्या दोन पदार्थांचे विषमांगी मिश्रण तयार 👐. हे द्रव आणि स्थायू यांचे मिश्रण आहे.  

निलंबनातील स्थायूकणांचा व्यास 10-4 मीपेक्षा जास्त असतो. त्यामुळे त्यातून प्रकाशाचे संक्रमण होत नाही, तसेच सामान्य गालनकागदावर हे स्थायूकण अवशेषी म्हणून राहतात व गालनक्रियेने निलंबनातील द्रव व स्थायू घटकांचे विलगीकरण होते.

        ┅━═▣𐏓* 𒐕 𐏓*▣═━┅

🎷कलिल (Colloid):  

  1. विषमांगी मिश्रणाला कलिल म्हणतात.
  2. कलिल कणांचा व्यास 10-5 मी. च्या जवळपास असतो. 
  3.  पाणी व दूध यांचे मिश्रण अर्धपारदर्शक आहे. म्हणजेच ह्या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपतन केले असता त्याचे काही प्रमाणात संक्रमण व काही प्रमाणात अपस्करण होते. याचे कारण म्हणजे ह्या विषमांगी मिश्रणामधील पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत असतात. 
  4.  कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गालनकागदाची छिद्रे मोठी असल्याने गालनक्रियेमुळे कलिल ह्या विषमांगी मिश्रणाचे विलगीकरण होत नाही. 
  5. दूध स्वत:च एक कलिल आहे. ह्यामध्ये पाणी ह्या माध्यमात प्रथिने, स्निग्ध पदार्थ इत्यादींचे स्थायूकण व द्रव थेंब यांचा व्यास 10-5 मी. च्या आसपास असतो.
  6. कलिलाचे प्रकार: a. वायूंमध्ये स्थायू - उदा.धूर., b. वायूमध्ये द्रव- उदा. धुके, ढग. 

████╗

████║

████╝

🏁 संयुगामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते.

       ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

🦅 संयुगाचे नाव, रेणूसूत्र, घटक मूलद्रव्ये, घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या तक्ता.

    

         ..•♡•:.🧿.:•♡•.

🎸 हायड्रोजन H हा सर्वात हलक्या मूलद्रव्याची संयुजा 1 आहे.

           °══✺══°

🎨 संबंधित मूलद्रव्यांच्या संयुजा शोधने. 


          ═ ❖• ✺ •❖ ═

 🛞 मूलद्रव्य जोड्यांपासून तयार होणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे.


▣◆★✧★◆▣
🪔 काही मूलद्रव्यांचे रासायनिक संघटन दिले आहे त्यावरून त्या द्रव्यांचा प्रकार ठरवा. 


    ╰✺༺☬༒☬✺╯

          _*माणसाचा सर्वात चांगला सहकारी

 त्याची प्रकृती आहे,*_

                    _*तिची साथ सुटली तर 

मात्र तो प्रत्येक नात्यासाठी 

ओझे होत असतो.*_ 

   _*म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या,

 व सुखाने जगा......!*_


   *आपला दिवस आनंदी जावो.*🎷


  






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...