मुख्य सामग्रीवर वगळा

9th, classification of plants 1, 9 वी, वनस्पतींचे वर्गीकरण 1.

 

9th, classification of plants 1, 9 वी, वनस्पतींचे वर्गीकरण 1.


आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील👇 What's App लिंक 🔗 ला स्पर्श करावा.🙏 
👉 माहिती विज्ञानाची 🎷
रॉबर्ट व्हिटाकर यांनी सजीवांचा अभ्यास करण्यासाठी पंचसृष्टी पद्धतीचा अवलंब केला. 

Five kingdom classification system was proposed by Robert Whittaker for the study of living organisms. 

🌿 वनस्पती म्हणजे काय
उत्तर:- पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती असे म्हणतात. 
🪘 What is a plant?
The group of autotrophic living organisms having eukaryotic cells with cell walls is called plants.

वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी अबीजपत्री व बीजपत्री अशा दोन उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला.

Eicher, a botanist, classified The Kingdom Plantae into two subkingdoms, cryptogams and phanerogams. 

🌿 वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो, ते स्पष्ट करा. 
उत्तर:-
  1. वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत, हे विचारात घेतले जाते. अवयव नसल्यास अशा वनस्पतींना थॅलोफायटा विभागात घेतात. 
  2.  पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्थांचे असणे (संवहणी) किंवा नसणे (असंवहणी) यांचा विचार केला जातो. वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का? आणि असल्यास बियांवर फळांचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो व शेवटी बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जातात.
  3. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी आणि बिजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबिजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात.
🪘 Which criteria are used for the classification of plants? explain with reasons. 
Ans:-
The presence or absence of organs is the first criterion for the classification of plants.
The presence or absence of separate conducting tissues for the conduction of water and food is the next consideration for classification.
Seeds:-
 Do the plants bear seeds? If they do then, whether the seeds are enclosed in a fruit or not is also an important criterion for classification.
Plants are grouped depending on the number of cotyledons in the seeds.
At the higher levels of plant classification, different
characteristics are considered for classification, e.g.
depending upon the absence or presence of flowers, fruits, and
seeds
, plants are classified as cryptogams or phanerogams.
Depending upon whether seeds are enclosed within a fruit or
not, phanerogams are classified as gymnosperms and
angiosperms. Angiosperms are further classified as monocots
or dicots depending upon the number of cotyledons in seeds.

🎆 विभाग 1 - थैलोफायटा(Thallophyta)
वैशिष्ट्य:- थैलोफायटा या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतूरूपी असते.
थैलोफायटा या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात.
 मूळ-खोड-पाने-फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या, हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला शैवाल (Algae) म्हणतात.
 शैवालामध्ये खूप विविधता आढळते. एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले आढळतात.
थैलोफायटा या वनस्पती काही गोड्या तर काही खारट पाण्यात आढळतात. 
थैलोफायटा ह्याच गटात हरीतद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशांचा स्वतंत्रपणे समावेश होतो, त्यास कवके (Fungi) असे म्हणतात.
उदा. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम, इत्यादी.

🚀 Division I - Thallophyta
 Feature:- plants usually have a soft and fiber-like body. Thallophyta plants grow mainly in water. 
The Thallophyta group of plants, which do not have specific parts like root-stem-leaves-flowers but are autotrophic due to the presence of chlorophyll, is called algae. Algae show great diversity. They may be unqicellular or multicellular, and
microscopic or large. 
Some Thallophyts are found in fresh water while some are found in saline water.  
Various types of fungi like yeasts and molds which do not have chlorophyll are also included in this group.
 Ex. Aspergillus, Penicillium.
Examples of algae are Spirogyra, Ulothrix, Ulva, Sargassum, etc.

विभाग II- ब्रायोफायटा (Bryophyta)
रचना:- ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी, रिबिनीसारखी लांब असते.
 ब्रायोफायटा या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात. 
 ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना, वनस्पतीसृष्टीचे 'उभयचर' म्हटले जाते कारण त्या ओलसर मातीत वाढतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. 
ब्रायोफायटा या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतांत. 
ब्रायोफायटामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. 
 पाणी व अन्नाच्या बहनासाठी विशिष्ट ऊती नसतात.
 उदा. मॉस (फ्युनारिआ), रिक्सिया, मकैशिया, ॲन्थॉसिरॉस, इत्यादी. 

💐 Division II - Bryophyta
structure:-The structure of the plant body of bryophytes is flat, ribbon-like long, without true roots, stem, or leaves. Instead, they have stem-like or leaf-like parts and root-like rhizoids. 
 The Bryophyta group of plants is called the ‘amphibians’ of the plant kingdom because they grow in moist soil but need water for reproduction. 
 Bryophyta plants are thalloid, multicellular, and autotrophic.  Bryophyta reproduces by spore formation.
Bryophyta do not have specific tissues for the conduction of food and water. 
Ex. Moss (Funaria), Marchantia, Anthoceros, Riccia, etc.



         *नात्यांचा स्वाद 
अमृता सारखा असतो. 
थेंबभर मिळाला तरी, 
आयुष्यभर पुरतो.*
 *तसेच आपुलकीचं नातं
 दुधात मिसळलेल्या साखरे प्रमाणे असतं, 
गोडवा असतो पण दिसत नाही.... .

      *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं