मुख्य सामग्रीवर वगळा

10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.7, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.7.

 

10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.7, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.7.


आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी खाली दिलेल्या स्पर्श करा 👇

👉माहिती विज्ञानाची 🎷

🧬गुणसूत्राचा आकार कसा असतो? आकृती काढून त्या भागांची नावे लिहा.
उत्तर: 
  • प्रत्येक गुणसूत्रांमध्ये दंडाकृती आकाराचे DNA असते. 
  • गुणसूत्रे ही प्राथमिक संकोचन व गुणसूत्रबिंदू यांनी बनलेली असतात. त्यामुळे गुणसूत्रांचे दोन भाग पडतात. प्रत्येक भागास "गुणसूत्रभुजा"असे म्हणतात.
  • इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी च्या साह्याने पेशी विभाजनाच्या वेळेसच गुणसूत्रे आपणास पाहता येतात.
  • गुणसूत्रांची लांबी व सेंट्रोमेअर च्या स्थितीवरून त्यांचे चार प्रकार पडतात 
  1. मेटासेंट्रिक, 
  2. सबमेटासेन्ट्रिक, 
  3. एक्रोसेंट्रिक आणि 
  4. टेलोसेन्ट्रिक .

🎇 What is the shape of a chromosome? Draw a figure and give its name.
Ans: 
• Chromosomes are rod-shaped structures. 
• Under an electron microscope we can see chromosomes only at the time of cell division.
• Humans have linear chromosomes.
• Depending upon the position of the centromere, there are four types of chromosomes.
1. Metacentric 
2. submetacentric
3. Acrocentric 
4. Telocentric



🧬 सूत्री पेशीविभाजन Mitosis
कायपेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजन प्रक्रियेने विभाजित होतात. 
• सूत्री पेशीविभाजन हि प्रक्रिया मुख्य दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ते दोन टप्पे म्हणजे
•  प्रकलविभाजन /केंद्रकाचे विभाजन (Karyokinesis) आणि 
• परीकलविभाजन/ जीवद्रव्याचे विभाजन (Cytokinesis).
प्रकलविभाजन चार पायऱ्यांमध्ये पूर्ण होते.
1. पूर्वावस्था
2. मध्यावस्था
3. पश्चावस्था
4. अंत्यावस्था.

🦕 Mitosis:
  • Somatic cells and stem cells divide by mitosis.
  • Mitosis is completed through two main steps. Those two steps are karyokinesis (nuclear division) and 
  • cytokinesis (cytoplasmic division). 
  • Karyokinesis is completed through four steps.
  1. Prophase
  2. Metaphase
  3. Anaphase 
  4. Telophase

🌺 पूर्वावस्था (Prophase) : 
  • प्रकल विभाजनाच्या (म्हणजेच केंद्रकाचे विभाजन) पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन (Folding / Condensation) होते. 
  •  वलीभवनामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित (Sister chromatids) दृश्य व्हायला सुरुवात होते.
  •  तारा केंद्र (centriole) द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. 
  • केंद्राकावरण (nuclear membrane) आणि केंद्रिका (nucleolus) नाहीसे व्हायला सुरुवात होते.

💐 Prophase
  • In prophase, condensation of thin thread-like chromosomes start.
  •  Due to condensation, they become short and thick and they start to appear along with their pairs of sister chromatids.
  • Centrioles duplicate and each centriole moves to opposite poles of the cells.
  •  The nuclear membrane and nucleolus start to disappear.

🎊   मध्यावस्था:
  • मध्यावस्थेमध्ये केंद्राकावरण पूर्णपणे नाहीसे होते. 
  • सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित (Sister chromatids) स्पष्टपणे दिसतात.
  • सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला (मध्य प्रतलाला) समांतर अवस्थेत संरचित (Arrange) होतात.
  •  दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू (Centromere) यादरम्यान विशिष्ट अशा लवचीक प्रथिनांचे धागे (Spindle fibres/तुर्कतंतू ) तयार होतात.


🎈 Metaphase :
  •  Nuclear membrane completely disappears in metaphase.
  • Chromosomes complete their condensation and become visible along with their sister chromatids. 
  • All chromosomes are arranged parallel to the equatorial plane (central plane) of the cell. 
  • Special type of flexible protein fibers (spindle fibers) are formed between the centromere of each chromosome and both centrioles. 

  • 💀 पश्चावस्था (Anaphase) :
  • पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते.
  •  वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्यगुणसूत्रे (Daughter chromosomes) म्हणतात.
  •   ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. 
  •  गुणसूत्रांचे दोन-दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात.


🎷 Anaphase :
  •  In anaphase, centromeres split, and there by sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite directions with the help of spindle fibers. 
  • Separated sister chromatids are called as daughter chromosomes.
  • Chromosomes being pulled appear like bunch of bananas.
  • Each set of chromosomes reach at two opposite poles of the cell.

  • 🎻 अंत्यावस्था (Telophase): अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात (Unfolding/ Decondensation). त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात.
  •  दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचांभोवती केंद्रकावरण तयार होते.
  •  एका पेशीमध्ये दोन जन्यकेंद्रके (Daughter nuclei) तयार होतात. 
  • जन्यकेंद्रकांमध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात.
  • तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात.



🔦 Telophase
  • The chromosomes that have reached opposite poles of the cell now start to decondense due to which they again become thread-like thin and invisible.
  •  A nuclear membrane is formed around each set of chromosomes reached at the poles.
  •  Two daughter nuclei are formed in a cell. 
  • A nucleolus also appears in each daughter nucleus. 
  • Spindle fibers completely disappear. 

*कौतुक आणि टिका 
या दोन्हीचाही स्विकार करा ,, कारण झाडाच्या वाढीसाठी 
ऊन आणि पाऊस 
या दोन्हीचीही गरज असते !!!*
   तुमचा दिवस आनंदात जावो,🦢🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10 th,Sci.I, Periodic classification of elements I.

10 th, Sci.I,Periodic classification of elements I.   ▬▬▬۩۞۩▬▬▬ आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 माहिती विज्ञानाची 🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ As we grown up, we forget the definition and some terms or do not fully/ totally understand the exact meaning of those words. Today's main objective is to increase basic chemistry knowledge with gradual study . In science meaning of unchangeable terms are useful in day today life .  🎻  Definition of element :- Element is a substance that cannot be broken down into simpler substances by chemical means. Element is also defined as a pure substance made up of only one kind of atom which can't be split up into two or more substance. Ex. Silver Ag ,   Chlorine Cl ~*◄⏤͟͞✥➳  🪷 Atom :- An atom is the basic building block. Atom is the smallest unit of matter that has the characteristic properties of an element. In the nucleus of atom positively charged protons p and ne...

10 वी, भाग 1, गुरुत्वकर्षण. मराठी .,10 th, Part 1, Gravitation Exercise in Marathi 🎷

  १० वी, भाग १, गुरुत्वकर्षण. मराठी .🎷 व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा ( माफ करा🙏 फॉन्ट प्रॉब्लेम मुळे हा स्वाध्याय खराब झाला आहे. हा स्वाध्याय दुरुस्तीसाठी सध्या आहे. कृपया सध्या पाहू नये) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा गुरुत्वकर्षणाचा सार्वत्रिक नियम लिहा. अवकाश पृथ्वीच्या स्थानावर g चे मूल्य उताराची किंमत.....% ने असते.  अंतर स्थानात g चे मूल्य  पृथ्वीला घडवण्यासाठी त्याचे मूल्य फक्त........ % कमी असते. ....... हे परवर्तक दुर्बिण तयार करणारे आधी होते. ...........  हे परवर्तक दुर्बिणी बनवणारे आधी होते. अभिकेंद्री बल म्हणजे काय? केंद्राभिमुख प्रदान करा. SI एक प्रणाली G चे एक ...... आहे. SI एककात जीचे मूल्य ........ आहे. ..... म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग. ...... हा एक प्रकार आहे ज्याला इलेक्ट्रोमॅगटिक वेव्ह्ने म्हणतात. ......... म्हणजे एखाद्या शंकूला एक प्रतलाने तिरके छेदले तयार होणार आकृती. ........ म्हणजे शंकूला कलत्या प्रतलाने कापल्यावर  वक्र. ग्रहाची इच्छाही........ आणि सूर्याचा कक्ष एका नाभीवर असतो. ज्याच्या एका...