मुख्य सामग्रीवर वगळा

10 th, Sci.2, Disaster management, 10 वी, विज्ञान भाग 2, आपत्ती व्यवस्थापन.


 10 th, Sci.2, Disaster management, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन.

चला एक भीष्मप्रतिज्ञा करू, दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू, विज्ञान जगू. आपल्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन हा सक्षम भारत निर्मितीस सहाय्य करेल. छान वैज्ञानिक माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे. जॉईन होण्यासाठी निळ्या लिंक ला स्पर्श करावा.
👇What's app link 👇
👉 🔴 माहिती विज्ञानाची 🎷 🔴

🎷 आपत्ती म्हणजे काय?
उत्तर: लोक, संरचना किंवा आर्थिक मालमत्ता यांना धोका निर्माण करणारी, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते अशा अकस्मात घडलेल्या घटनेला आपत्ती म्हणतात.
नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत.

🦘 What is a disaster?
 Ans: Disaster is the incidence that occurs suddenly causing heavy damage to life and property and social aspects.
Natural and man made these are the two types of disasters.


🥁 तुमच्या परिसरात घडलेल्या कोणत्या आपत्ती तुम्ही अनुभवल्या आहेत?
उत्तर
  • 30 सप्टेंबर 1993 चा किल्लारी भूकंप मी अनुभवला आहे.
  • 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला या घटनेबद्दल माहिती आहे.
  • 30 जुलै 2014 रोजी पहाटे माळीण गाव  धरणीच्या कुशीत सामावले गेले. या भीषण दुर्घटनेत 151 जणांचा झोपेतच मृत्यू झाला.या घटनेबद्दल माहिती आहे.

✍️ Which disasters have you experienced in your area?
Ans:  
  • I experienced the Killari earthquake of 30 September 1993.
  • On 26th November 2008 there was an attack at several places by Pakistani terrorists.
  • On July 30, 2014, a landslide occurred in Malin, In this terrible accident, 151 people died in their sleep. 

🦗 नैसर्गिक आपत्ती
भूकंप, पूर, वादळे, ओला व कोरडा दुष्काळ, ज्वालामुखी, टोळधाड, साथीचे आजार. या अकस्मात आलेल्या संकटामुळे समाज जीवनात खूप मोठे परिवर्तन होते व पर्यावरणाला प्रचंड हानी पोहोचते.

🦠 Natural disasters
Wet and dry famine, Locust/Grasshopper attacks, earthquakes, landslides, volcanic eruptions, floods, hurricanes, tornadoes, blizzards, tsunamis, cyclones, wildfires, and pandemics are all-natural disasters. A natural disaster is the highly harmful impact on a society, community, and in nature.

🔫 मानवनिर्मित आपत्ती
अणुभट्टीतील किरणोत्सर्ग, युद्ध, अतिरेकी कारवाया,दहशतवाद, दंगल,चेंगराचेंगरी, आग,  बॉम्बस्फोट, हल्ले, जाळपोळ, अपघात जसे रेल्वे अपघात, हवाई अपघात, जलवाहतूक अपघात, वायुगळती, इमारत कोसळणे, पर्यावरण ऱ्हास, माहिती तंत्रज्ञानाशीसंबंधित 
गुन्हे या सर्व मानवनिर्मित आपत्ती आहेत. 

🤳 Man-made disasters.
Fires, transport accidents, industrial accidents, oil spills, nuclear explosions/ radiation Chemical spills, hazardous material spills, explosives, chemical or biological attacks, nuclear blasts, rail accidents, airline crashes, or groundwater poisoning are all instances of man-made disasters. The environment gets damaged by man-made disasters.



 🤧 आपत्तीचे परिणाम
  • नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे समाजावर दीर्घकालीन आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिणाम होतो.
  • आजूबाजूच्या परिसरात मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे जीवित हानी व वित्तहानी होते.
  • आपत्तीची कारणे वेगवेगळी असतात त्यानुसार पर्यावरणातील ठराविक घटकावर त्या आपत्तीचा दुष्परिणाम उद्भवतो.
  • काही आपत्ती दीर्घकाळासाठी असतात जसे कोरोना तर काही आपत्ती अल्पकाळासाठी असतात जसे माळीन दुर्घटना. यावरून हे लक्षात येते की प्रत्येक आपत्ती ही वेगवेगळी असते आणि आपत्तीचा कालावधी पण एकसारखा नसतो.
  • ज्या ठिकाणी आपत्ती ओढवली आहे त्या परिसरातील जनजीवन विस्कळीत होते. आपद्ग्रस्तांची जैविक, आर्थिक तसेच अन्य प्रकारची मोठी हानी होते.

🐉 Effects of disasters
  • Due to disasters there is great loss to life and property of the people.
  • The life in the affected area is disturbed due to the disaster. ex. Killari earthquake.
  • Due to sudden disasters different areas of life are affected such as economic, cultural, and political.
  • Disasters are caused due to different reasons. Each disaster has its environmental impact.
  • The nature and duration of each disaster are different. The period of disaster decides whether it is short-term ex. Malin incidence, long term effect ex. corona, war.

 प्रलयंकारी आपत्ती
ओडिसातील व आंध्र प्रदेशातील चक्रीवादळे, गुजरात व लातूर मधील प्रलयंकारी भूकंप.
Catastrophic disasters
Cyclones in Odisha and Andhra Pradesh. Catastrophic disasters such as earthquakes in Gujarat and Latur. Frequently buzzing cyclones in coastal Andhra Pradesh, West Benga, and Tamil Nadu.

दुरगामी परिणाम करणाऱ्या आपत्ती
वाळवंटीकरण, कर्मचारी संप, शेतकरी संप, दुष्काळ, पिकावर अरिष्ठ, वाढणारी समुद्र पातळी इत्यादी दुरगामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती आहेत.

🦠 Disasters making the impact for a long duration
Desertification, various problems of crops, strikes of workers, strikes of farmers, famine, rising levels of oceans these are the disasters that impact long duration.

🔴 आपत्तींचे विविध निकषांच्या आधारे वर्गीकरण कसे करता येईल?
उत्तर: आपत्तींचे विविध निकषांच्या आधारे  पुढील मुद्द्यांच्या आधारे करता येते,
  • नुकसान होण्याचे प्रमाण,
  • आपत्तीचा कालावधी
  • दूरगामी परिणाम
  • आपत्ती येण्याचे कारण.
 
🔥How can disasters be classified depending on various criteria?
Ans: Disasters can be classified depending on the following main criteria are as follows.
  • The extent of the damage caused.
  • The period of disaster.
  • The long-term effects.
  • The reason for the disaster.

  *“नशीब” आकाशातून पडत नाही, किंवा “जमिनीतून” उगवत नाही...*
     *“नशीब” आपोआप निर्माण होत नाही...*
            *तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो...*
             *नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका...*
            *कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब” घडेल यावर विश्वास ठेवा.*

            *आपला दिवस आनंदी ज्ञानमय जावो.*🎷🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.