मुख्य सामग्रीवर वगळा

गाठभेट शास्त्रीय कारणांची..🎷

 


आज आपण प्रश्नपत्रिकेत विचारला जाणारा प्रश्न शास्त्रीय कारणे द्या पाहू. प्रत्येक प्रश्नाचे एक वैशिष्ट्य असते. त्या प्रश्नाचे वैशिष्ट्ये समजून घेऊन उत्तर लिहिले असता गुण (Marks)वजा होत नाही.

किती गुणांचा प्रश्न आहे त्याप्रमाणे आपले उत्तर असावे.परीक्षेत दोन मार्काला विचारला जाणारा हा प्रश्न आहे. वर्ग दहावीचा विचार केल्यास प्रश्न दुसरा अ. चार गुणासाठी हा प्रश्न असतो. या प्रश्न प्रकारात एक उपप्रश्न रसायनशास्त्रावर तर एक उपप्रश्न भौतिकशास्त्रावर आधारित असतो. तीन पैकी दोन शास्त्रीय कारणे सोडवायचे असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना दोन पैकी एक गुण मिळतो. कारण उत्तर मुद्देसूद नसते किंवा दोन महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण त्यात नसते.

शास्त्रीय कारण द्या आले म्हणजे त्या प्रश्नापुरता आपला विज्ञानाचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असे म्हणणे म्हणता येईल.

पुढे काही शास्त्रीय कारणे दया चे प्रश्न आहेत. चला प्रयत्न करा किती प्रश्नांची उत्तरे देता येतात.🎷

* बर्फ पाण्यावर का तरंगतो?

*आम्ली पर्जन्य का होते?

* चंद्राचा फक्त एकच भाग आपल्याला दिसतो.

*उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात.

*ग्रहांची टक्कर होत नाही.

*विद्युत घंटीत प्रवाह वारंवार खंडित होतो.

* एकपीक पद्धती धोकादायक ठरू शकते.

*दुभत्या जनावरांना आंबोण देतात.

* सपाट आरशातील वस्तूची प्रतिमा आरशामागे जाऊन पाहिल्यास दिसत नाही.

*संघननीला दोन तोट्या असतात.(condenser)

*उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.

* अणुंचे सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते.

*मेलेल्या जनावरांची आतडी वापरण्यात येतात.

*ॲम्बुलन्स AMBULANCE वर उलट अक्षरात ॲम्बुलन्स  का लिहिले असते?

*तंतुकणिकेला (mitochondria) ऊर्जा निर्मितीचे केंद्र म्हणतात.

* सौर ऊर्जा सगळ्या इंधनांचा ऊर्जा स्त्रोत आहे.

*गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात.

*रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खते वापरावीत.

* घोड्याला हरभऱ्याचा खुराक देतात.

*शनी हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे.

*उन्हाळ्यात बीज वाहकतारा सैल पडतात.

* साथीच्या रोगकाळात पाणी उकळून प्यावे.

*माठात पाणी थंड  होते.

* कार्बन डाय-ऑक्साइड अग्निशमनासाठी वापरतात.

*आरसे महालात खूप प्रतिमा दिसतात.

* पट्टी चुंबक लटकत ठेवला तर तो दक्षिण उत्तर दिशेत स्थिर राहतो.

*औद्योगिक सूक्ष्मजीव शास्त्रात परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे.

* सूर्य क्षितिजवर मोठा दिसतो.

* मरणोत्तर देहदान आणि मरणोत्तर अवयव दान यासारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.

* घरातील वीज वाहक तारा तांब्याच्या तर रस्त्यावरील अल्युमिनियमच्या असतात.

* पाणी उकळल्यावर त्याचे तापमान 100°C च्या वर वाढत नाही.

* भूक लागल्यावर पोटात कावळे का ओडतात?

*शेतजमिनींची चांगली नांगरट का करावी?

*अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात.

*मैदानी खेळाचे महत्व अतुलनीय आहे.

*जीवाश्म इंधनांचे साठे मर्यादित आहेत.

* वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण कायम आहे.

* आपणास उचकी का येते?

* 24 कॅरेट सोन्याचे अलंकार सहसा करत नाहीत.

* जांभयी का येते?

*आई-वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.

* अणु विद्युत दृष्ट्या उदासीन असतो.

* सूर्योदय किंवा सूर्यास्ताला क्षितीजावर विविध रंगछटा दिसतात.

*हिवाळ्यात सकाळी सकाळी रेल्वे स्थानकातील घोषणा आपणास सहज ऐकता येते.

* सोने , प्लॅटिनम यांना राजधातू म्हणतात.

*मदय सेवन कधीही वाईटच असते.

* हिवाळ्यात दवबिंदू का पडतात?

ही प्रश्न संख्या कमी आहे. शास्त्र जसे जसे शिकत जाऊ त्याचप्रमाणे बुद्धी वाढल्यावर आणखीन काही प्रश्न आपणास पडत जातात. असे म्हणतात की काही प्रश्नांचे उत्तर शास्त्रज्ञाकडे पण नाही. दररोज नवीन ज्ञानात भर ही पडतच आहे. आपला प्रयत्न चालू ठेवावा ,अखंड शिकत राहावे. आयुष्यभर आपण विद्यार्थीच आहोत ही जाणीव ठेवल्यास नवीन शिकण्याची उमेद कायम राहते. 🙏


आज आपण इयत्ता दहावी भाग 1 चे काही शास्त्रीय कारणे पाहू

* आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसतो  किंवा

सूर्यास्त झाल्यानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो.

( अपवर्तन, वातावरण)

उत्तर:- 1. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे वरील क्रिया घडते.

2. सूर्यकिरण हे अवकाशातून वातावरणात प्रवेश मध्यम बदलामुळे ( निर्वात ,हवा) स्तंभिकेकडे  झुकतात म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. सूर्याकडून आलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात गेल्यावर सूर्य आपणास दिसतो.

3. अपवर्तनामुळे जरी प्रत्यक्ष सूर्य क्षितिजाखाली असला तरीही सूर्य क्षितिजावर असल्याचा भास होतो म्हणून आपणास सूर्योदयापूर्वी काही काळ सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो, त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो.


2. तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत.

( बिंदू स्त्रोत , वातावरण,  अपवर्तन,  आभासी स्थिती )

उत्तर:- A. 1.आपल्यापासून तारे अत्यंत दूर अंतरावर (प्रकाश वर्ष) असल्यामुळे ते बिंदू स्त्रोतासारखे असतात.

2. वातावरणीय बदल यात हवेची घनता, हवेचे तापमान, हवेची होणारी सतत हालचाल यामुळे वातावरण स्थिर नसते. याचाच परिणाम त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो.

 3.वरील सर्व गोष्टीचा एकत्र परिणाम  होऊन ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यात सतत बदल होत असतो. म्हणून आपणास तारे लुकलुकताना दिसतात.

B.1.ग्रह हे बिंदू स्त्रोता ऐवजी बिंदू स्त्रोतांचा समूह ठरतो, ग्रह ताऱ्यांच्या तुलनेत आपणास बरेच जवळ असतात.

2. ग्रहांची सरासरी स्थिती व प्रखरता ही कायम राहत असल्यामुळे ताऱ्या प्रमाणे ग्रह लुकलुकत नाहीत. वातावरणीय बदलाचा एवढा जास्त परिणाम ग्रहांच्या स्थितीवर होत नाही.


* पाण्यात अर्धवट बुडलेली पेन्सिल पाण्याच्या पृष्ठभागाशी वाकलेली दिसते.

( माध्यम बदल अपवर्तन )

उत्तर:- 1. घन माध्यमातून विरल माध्यमात प्रकाश किरण प्रवेश करताना ते स्तंभिकेपासून दूर जातात.

2. पाण्यात तिरप्या बुडालेल्या पेन्सिलच्या पाण्यातून भागाकडून येणाऱ्या प्रकाश किरणांचे अपवर्तन झाल्यामुळे ते प्रकाश किरण सरळ रेषेत न दिसता मार्ग बदलामुळे पाण्यात अर्धवट बुडलेली पेन्सिल पाण्याच्या पृष्ठभागाशी वाकलेली दिसते.


* धातूच्या भांड्यात ठेवलेले नाणे कडेने पाहिले असता दिसत नाही परंतु त्या भांड्यात पाणी ओतताच ते नाणे दिसू लागते.

(अडथळा , अपवर्तन )

उत्तर :- 1.वस्तू कडून आलेले प्रकाश किरण जोपर्यंत डोळ्यात शिरत नाही तोपर्यंत ती वस्तू डोळ्यांना दिसत नाही.

2. धातूच्या रिकाम्या भांड्यात नान्याकडून आलेले प्रकाश किरण भांड्याच्या कडेकडून अडवली गेल्याने नाणे दिसत नाही.

3. परंतु भांड्यात पाणी ओतल्यावर पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमातून प्रकाश किरण येताना स्तंभिकेपासून दूर वळतात. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे भांड्यात पाणी ओततात आपणास नाणे दिसते.


* घड्याळ दुरुस्तीमध्ये साधा सूक्ष्मदर्शक वापरतात.

( तत्व , प्रतिमेचे स्वरूप )

उत्तर:- 1. बहिर्वक्र भिंगाच्या नाभीय अंतराच्या आत पदार्थ ठेवला असता त्या पदार्थाची प्रतिमा ही सुलटी, त्याच बाजूस व विशालीत मिळते.

2.घड्याळाचे सूक्ष्म काटे, चक्रे व संस्था सूस्पष्ट पाहण्यासाठी घड्याळजी घड्याळ बहिर्वक्र भिंगाच्या नाभी अंतरात ठेवून त्याची योग्य ती प्रतिमा डोळ्यावर ताण न पडता मिळवतो.

* जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास लाल रंगाचे प्रकाशवलय दिसते.

(संवेदना, दृष्टीसातत्य कालावधी)

उत्तर:- 1. एखादी वस्तू डोळ्यासमोर धरल्यावर त्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर काही सेकंद टिकते.

2. दृष्टी सातत्याच्या तत्त्वानुसार वेगाने वर्तुळाकार उदबत्ती फिरवल्यास, पूर्वीच्या प्रतिमेची संवेदना व नवीन प्रतिमेची संवेदना यामध्ये एकसंधपणा जाणवतो ,म्हणजेच 1/16 सेकंदाच्या आत जर पुढची प्रतिमा तयार झाली तर आपणास लाल वर्तुळ (लाल रंगाचे प्रकाश वलय)दिसते.


 * रंगांध व्यक्तींना निरनिराळ्या रंगांचा भेद करणे शक्य होत नाही.

(रंगात भेद, शंक्वाकार पेशी )

उत्तर:-1. मानवी डोळ्यांना रंगांची जाण ही डोळ्यातील दृष्टी पटलातील शंक्वाकार पेशी मुळे होते. शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगांना प्रतिसाद देतात.

2. रंगांध व्यक्तीच्या डोळ्यात विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार

 पेशी नसतात. त्यामुळे त्यांना निरनिराळ्या रंगांचा भेद करणे शक्य होत नाही.


* वाहन चालकाला परवाना देताना रांगांधता दोषाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असते.

( रंगात भेद, सिग्नल, सूचनाफलक , अपघात)

उत्तर:- 1. लाखांमध्ये काही व्यक्तींनाच विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या  शंक्वाकार पेशींचा अभाव असतो. 

2.अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाही किंवा निरनिराळ्या रंगात फरक करू शकत नाहीत. अशा व्यक्तींना रांगांध व्यक्ती म्हणतात.

3. रंगात भेद न करता आल्यामुळे सिग्नल वरील रंग किंवा सूचनाफलकांचे रंग त्यांना समजले नाही तर अपघात होऊ शकतो. म्हणून वाहन चालकाला परवाना देताना रांगांधता दोषाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

10 th, part 1, Gravitation 1 🎷

  10 th, part 1, Gravitation 1 🎷 A Link 🔗 for Test  on Gravitation 1 chapter given below 👇 🎷 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 🌞 What are the effects of force acting on an object?  Ans: A force can change the shape and size of the body on which the force acts. Can change the speed of the body, Force can stop a moving body,  A force can set a body in motion , Force can change the direction of motion of the body, Force can change the speed as well as the direction of motion of the body.  🎷 What types of forces are you familiar with ? Ans:  gravitational force  nuclear force Electromagnetic force Frictional force Magnetic force,  Spring force, Muscular forces. Tension force, Air resisting force. 🔱 What do you know about the gravitational force ? Ans: the gravitational force is a universal force; i.e., gravitational force acts between any two objects in th...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.