10 वी, विज्ञान I, प्रकाशाचे अपवर्तन...🎷
✨🌺✨ 🎷*✨🌺✨
*आपल्या आयुष्याचा प्रवास सहज,*
*आणि सोपा करण्यासाठी,*
*आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करा...!!*
✨🌺✨ 🎷🥁🎻✨🌺✨
व्याख्या प्रकाश :-
400 nm ते 800 nm दरम्यान डोळ्यांना दिसू शकणाऱ्या विद्युत चुंबकीय प्रारणांना प्रकाश असे म्हणतात.
* प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय?
एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण त्या पृष्ठभागावरून परत फिरण्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात.
* प्रकाश परावर्तनाचे नियम .
1. आपाती प्रकाश किरण , परावर्ति प्रकाश किरण आणि आपात बिंदूपाशी काढलेली स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
2. आपाती प्रकाश किरण आणि परावर्तित प्रकाश किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूंना असतात.
3. आपाती कोन आणि परावर्ति कोन यांची मापे समान असतात. <i = <r
* प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय?
🎷 प्रकाशाच्या अपवर्तनाचे निसर्गात आढळणारे उदाहरण म्हणजे मृगजळ व तार्यांचे लुकलुकणे
* अपवर्तनाचे नियम
1. आपत्ती किरण व आपात बिंदू पाशी काढलेली स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
2. आपाती किरण व अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास ( side ) असतात.
3. दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरिता, sin i व sin r यांचे गुणोत्तर स्थिर असते.
sin i /sin r = स्थिरांक= n
(n या स्थिरांकस पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. या नियमास स्नेलचा नियम म्हणतात.
* माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो.
माध्यम. अपवर्तनांक
हवा 1.0003
बर्फ 1.31
पाणी 1.33
CS2 1.63
हिरा 2.42
* अपवर्तनामध्ये प्रकाशाचे वर्तन
1. प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना स्तंभिकेकडे झुकतात.
2. प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर जातात.
3. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाश किरण लंबरूप जात असल्यास त्यांची दिशा बदलत नाही.
* आपाती कोन शून्य असताना अपवर्ति कोन किती अंशाचा असतो?
उत्तर :- आपत्ती कोन शून्य असताना अपवर्ती कोनही शून्य असतो.
* प्रकाशाचे अपस्करण
प्रकाशाचे त्यांच्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात.
* काचेच्या लोलकाचा ( prism )उपयोग करून सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती (spectrum )मिळवली.
🎷 काचेच्या लोलकामुळे सूर्यप्रकाशाचे अपस्करण होताना तांबड्या/ लाल रंगाच्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते.
तांबड्या किरणांची तरंग लांबी 700 nm च्या जवळपास असते.
काचेच्या लोलकामुळे सूर्यप्रकाशाचे अपस्करण होताना जांभळ्या रंगाच्या प्रकाशाचे विचलन सर्वात जास्त होते.
जांभळ्या किरणांची तरंग लांबी जवळपास 400 nm मीटर असते.
* दोन लोलकांच्या सहाय्याने पांढऱ्या आपाती प्रकाशापासून पांढरा निर्गत प्रकाश कसा मिळवता येईल ?
पहिल्या लोलकाला समांतर पण वरची बाजू खाली असेल असा दुसरा लोलक ठेवा. पहिल्या लोलकाद्वारे तयार होणारे वर्णपंक्तीचे रंग दुसऱ्या लोणकामधून जाऊ द्यावेत. आपणास दुसऱ्या लोलकाद्वारे पांढरा निर्गत प्रकाश मिळेल. कारण प्रथम पहिल्या लोलकाद्वारे प्रकाशाचे अपस्करण होते , तर दुसऱ्या लोलकामुळे प्रकाशाचे एकत्रीकरण होऊन शुभ्र प्रकाश मिळतो.
* काचेचे लोलक असलेले झुंबर त्यात टंगस्टनचा बल्ब लावला असता प्रकाशाचे अपस्करण होते व आपल्याला रंगीबेरंगी रंगपंक्ती मिळते जर आपण टंगस्टन बल्ब ऐवजी एलईडी ( LED ) बल्ब लावला तर रंगपंक्ती दिसेल का?
एलईडी ( LED- light emitting diode ) मध्ये 400 nm ते 700 नॅनो मीटर व्यक्तीमधील सगळ्यात रंग लांबींचे प्रकाश किरण नसल्यामुळे रंगपंक्ती दिसणार नाही.
* प्रकाशाचे आंशिक परावर्तन
जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतात तेव्हा परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो, यास प्रकाशाचे आंशिक परावर्तन असे म्हणतात.
* पूर्ण आंतरिक परावर्तन
r= 90° असताना प्रकाश किरण पाण्याच्या पृष्ठभागात समांतर जाईल. i आणखी वाढवल्यास r > 90°शक्य नसल्याने प्रकाश हवा या माध्यमातून शिरता त्याचे पूर्णपणे पाण्यामध्ये परावर्तन होते, यास प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणतात.
व्याख्या:- प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना, आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा जास्त असल्यास प्रकाशाचे अपवर्तन न होता प्रकाशाचे पूर्णपणे घन माध्यमात परावर्तन होते यास प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हणतात.
* Optical fibres ऑप्टिकल फायबर मध्ये अंतरिक परावर्तनाचा उपयोग होतो.
* हिऱ्याचे चकाकणे हे पूर्ण आंतरिक परावर्तनाचे योग्य उदाहरण होय
* क्रांतिक कोन
प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना ज्या आपाती कोनासाठी अपवर्तन कोनाचे मूल्य 90° होते , त्या कोनास क्रांतिक कोन म्हणतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा